पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुस्लीम शासक नि त्यांचे उच्च राजकीय हुद्देदार, सेनाध्यक्ष धर्माच्या नावाखाली राजनैतिक व आर्थिक स्वार्थ साधत होते. अनेकदा या स्वार्थापोटी मुस्लीम साम्राज्यात धर्मभावना भडकावल्या जात. मुस्लीम सामन्त आपली भूक हिंदू सामंतांच्या समूळ उच्चाटनाने भागवत. इस्लामनी त्याच्या धर्मगुरु, मुल्लामौलवींनी सुलतानांना तर शिकवण देऊन पटवून दिले होते की, 'हिंदूकाफिरांना मुसलमान बनवणे हे पवित्र धर्मकृत्य आहे. हिंदूची जात-संस्कृती प्राचीन काळापासून चालत आलेली होती. तीत धर्मगौरवाची भावना तीव्र होती. त्यांच्याकडे ज्ञानाचा वारसा होता. परंतु त्यांच्यात राजकीय वारशाची पोकळी होती. ती भरून काढण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत राहायचे.

 मुस्लीम सामंत शासक तर हिंदू सामंत, महाजन, जमीनदार शासित होते. अनेक मुस्लीम सामंत, सरदारांनी हिंदूंवर अनन्वित व अमानुष अत्याचार केल्याची नोंद इतिहासात आढळते.

 परंतु हे सत्य अस्तित्वात येण्याचे मूळ कारण आपण शोधू लागलो तर असं दिसून येतं की लोक जे मध्य आशियातून आलेले होते, ते सभ्य गणले जात असले, तरी मूलतः सभ्य नव्हते. त्यांच्या रोमारोमांत, कणाकणांत भटकं, आक्रमक योद्धा रक्त वाहात होतं. हे जेव्हा मध्य पूर्वेतील पठारावर फिरत होते, तेव्हा ते बौद्ध बनवले गेले. सम्राट अशोकाच्या उपदेशांनी आणि कनिष्काच्या धर्म प्रचारांनी त्यांना जरी बौद्ध बनवले असले, तरी तो कायाकल्प नव्हता. होता तो बाह्य बदल, ते वरवरचे सभ्य बनले होते. ते जेव्हा हिंसक आक्रमण करत पश्चिम आशियात घुसले तेव्हा शासनाच्या संपर्कात आले. आणि आपला पूर्व बौद्ध धर्म विसरले नि झटक्यात त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.

 एका विशिष्ट देश, काल, परिस्थितीच्या संदर्भात अरब जातींच्या एकीकरणाच्या उद्देशाने महंमद पैगंबरांनी धर्मयुद्ध अर्थात ‘जिहाद' महत्त्वपूर्ण मानला होता. महंमद पैगंबरांनी ज्या ज्या धर्मांचा अभ्यास केला होता त्या धर्मातील ऋषींना त्यांनी संतच मानले होते. मुस्लीम विजयी आक्रमकांनी मात्र राजकीय स्वार्थापोटी त्याला धर्माचा मुलामा चढवला.

 प्रत्येक देश नि काळात मानव जातीने एकाच वेळी दोन परस्परविरोधी वृत्ती प्रकट केल्या आहेत. १) संकुचित वृत्ती २) उदारमतवादी वृत्ती. इस्लाम धर्मात कुराण प्रमाण मानणाच्या नि ईश्वरभक्तीत लीन झालेल्या सूफी संतांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. मुल्ला-मौलवी आणि सुलतानांनी अशांना ‘काफिर' संबोधून त्यांची टर उडवली.

साहित्य आणि संस्कृती/१२०