पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आचार्य द्विवेदींनी प्रस्तुत निबंधात पुढे स्पष्ट केले आहे की, एवढ्यात क्षेत्रात नाही तर कला, तत्त्वज्ञान, धर्म, साहित्य या प्रांतांमध्येही सामंजस्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. आपण एकतेसाठी कार्यक्रमांचे जितके वैविध्य आणू, आपण तितके एकमेकांच्या जवळ येऊ. खरं पाहिलं तर एकता आपले लक्ष्य नव्हे. त्यापेक्षा व्यापक उद्देश घेऊन भविष्यकाळात आपण सक्रिय राहायला हवे. या निबंधातील पुढील विचार त्यांना व्यापक तत्त्वचिंतक बनवतो. ते मानवतावादी विचारवंत होते ही गोष्टही त्या विचारांनी अधोरेखित होते. ते म्हणतात, “वस्तुतः हिंदू-मुस्लीम एकता भी साधन है, साध्य नहीं। साध्य है मनुष्य को पशु-सामान्य स्वार्थी धरातल से ऊपर उठकर ‘मनुष्यता के आसन पर बैठना।"(अशोक के फूल - पृ. ६७). दादरी घटना आठवली की या विचारातील गांभीर्य अधिक ठळक होते. सदर निबंधाचा शेवट करताना त्यांनी म्हटले आहे की, “हिंदू-मुस्लीम मिलन का उद्देश्य है, मनुष्य को दासता, जड़िमा, मोह, कुसंस्कार और परमुखापेक्षिता (परावलंबन) से बचाना, मनुष्य को क्षुद्र स्वार्थ और अहमिका की दुनिया से ऊपर उठाकर सत्य, न्याय और औदार्य की दुनिया में ले जाना, मनुष्य द्वारा मनुष्य के शोषण को हटाकर परस्पर सहयोगिता के पवित्र बंधन में बाँधना। मनुष्य का सामूहिक कल्याण ही हमारा लक्ष्य हो सकता है। वही मनुष्य का सर्वोत्तम प्राप्य है।' (अशोक के फूल - पृ. ६८) ते आजही तंतोतंत खरे नि आवश्यक आहे. भारतीय सांस्कृतिक समस्येचे समूळ उच्चाटन करायचे तर या व्यापकतेस पर्याय नाही.


भारतीय संस्कृतीचे योगदान


 ‘अशोक के फूल' निबंध संग्रहात संस्कृतीविषयक आणखी एक निबंध आढळतो. त्याचे शीर्षक आहे, ‘भारतीय संस्कृति की देन'. आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांनी सदर निबंधातून भारतीय संस्कृतीने जगाला काय दिले, याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या आकलनानुसार भारताने जगाला आणि त्यातल्या त्यात आशिया आणि युरोपला तीन गोष्टींची देणगी दिली - १) अहिंसा आणि मैत्रीचा संदेश २) व्यापक आध्यात्मिक अनुभूती ३) धर्म, विज्ञान, मूर्तिकला, मंदिर-शिल्प, तत्त्वज्ञान, काव्य, नाटक, चिकित्साशास्त्र, ज्योतिष इ. क्षेत्रातील अनेक मौलिक गोष्टी. प्रस्तुत निबंधातून आचार्यांनी संस्कृतीचे स्वरूप विशद करत तिच्या अंगोपांगांची चर्चा केली आहे. त्यामुळे या

साहित्य आणि संस्कृती/१०५