पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे की या विविध जात, वंशीय समाजात आपसात रोटी व्यवहारांबरोबर बेटी व्यवहारही झाले. परिणामी इथे संकरित समाज निर्माण झाला. आचार्यांनी यासाठी निबंधात ‘सांकर्य' शब्दाचा वापर केला आहे. ‘छुआछूत, अंतर्विवाह, हक्कापानी आदि बातें इन जातियों के परस्पर सांकर्य में बाधा भी देती है और इनकी सामाजिक मर्यादा भी बताती है। पुराना साहित्य और इतिहास साक्षी है कि मुसलमानों के आने के पहले यह मर्यादा उतनी दुर्लघ्य नहीं बनी थी, जितनी बाद में हो गई।" (अशोक के फूल पृ. ६१)

 भारतात त्या वेळी गवळी, चांभार, लोहार, सुतार, भंगी, कैकाडी (निवार) अशा व्यवसायवाचक जाती व समाज होते. ते सर्व आपलं जीवन कर्मफळाच्या सिद्धांतास प्रमाण मानून जगत. त्यामुळे इथे कधी संघर्ष वा विद्रोह झाला नाही. मध्य युगातील जागृतीनंतरही इथे सर्व वर्षीय एकत्र राहात होते. इथे केवळ जातभिन्नता वा वैविध्य होते असे नाही. तर इथे धर्म वैविध्यही होते. बौद्ध, वैश्य, जैन, मुसलमान, शीख, पारशी धर्माचे लोक आपला धर्म पाळत असत. तरी त्यांच्यात परस्पर ऐक्य होते. आचार्य द्विवेदी म्हणतात की याची तीन कारणे होती - एक-इथल्या विविध धर्म, पंथ, जातीच्या संतांनी जी शिकवण दिली ती एकात्मतेचीच होती. दाराशिकोहचे नाव या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. कुराण, गीता, बायबल, वेदांमधील भक्तीसाम्य दाखवणाच्या ऋचा, श्लोक, आयते, कलमांची आपणाकडे रेलचेल आहे. दुसरे असे की, येथील लौकिक जीवनातील नृत्य, गाणी, खेळ, तमाशे, कपडे, दागिने, यांच्यात देवाण-घेवाण होत आली आहे. तिसरे क्षेत्र म्हणजे, ज्योतिष, गणित, चिकित्सा इत्यादी. वैज्ञानिक क्षेत्रातही एकमेकांचा एकमेकांवर असलेला प्रभाव व साम्य. या सा-यांवर वैविध्य असून इथली एकता उभी आहे. त्याची मीमांसा करताना आचार्य द्विवेदींनी स्पष्ट केले आहे की, ‘साधारण जनता उच्च तर आध्यात्मिक अनुभूतियों की अपेक्षा धर्म की रूढियों को अधिक मानती है।" (अशोक के फूल - पृ. ६६). आचार्य हजारीप्रसाद द्विवेदींनी फसली सन, ईसवी सन, बगाब्द यांचे उदाहरण देऊन असे नमूद केले आहे की इतिहासात मुसलमान शासकांनी सौर वर्ष आणि हिजरी वर्ष यांच्यात समन्वय करून नवीन शक चालविल्याचे दिसते. त्यावरून ते असे सुचवू इच्छितात की, “शायद इतिहास में हमें यह सीखना अभी बाकी है की सांप्रदायिक मिलन की भूमि वैज्ञानिक मनोवृत्ति है। इसी को उत्तेजित करना वांछनीय (अपेक्षित) है।" (अशोक के फूल पृ. ६७) आपण आजही या दृष्टीने एकतेकडे पाहात नाही याची खंत वाटते.

साहित्य आणि संस्कृती/१०४