पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘अशोक के फूल' मधील ‘भारतवर्ष की सांस्कृतिक समस्या' व 'भारतीय संस्कृति की देन'; ‘कल्पलता' संग्रहातील संस्कृतियों का संगम' सारखा निबंध; ‘विचार और वितर्क' संग्रहातील ‘हमारी संस्कृति और साहित्य का संबंध' आणि 'हिंदू संस्कृति के अध्यापन के उपादान'; ‘कुटज' मधला ‘भारतीय संस्कृति के मूलस्त्रोत-वेद'सारखे निबंध वाचताना आचार्यांचं भारतीय संस्कृतीविषयक आकलन स्पष्ट होते. आचार्यांना ‘संस्कृती पुरुष' का म्हटले जाते या निबंधावरून स्पष्ट होते.


भारताची सांस्कृतिक समस्या


 ‘भारतवर्ष की सांस्कृतिक समस्या' हा त्यांचा संस्कृती विषयावर लिहिलेला पहिला लेख. आचार्य हजारीप्रसादांनी या निबंधात एक प्रश्न उपस्थित केला आहे की इतक्या वर्षांच्या उलथापालथीनंतरही भारताची एक संस्कृती निर्माण का नाही होऊ शकली? आपण पाहतो की भारतात जितके प्रांत आहेत, त्यांचे स्वतःचे सण, पोषाख, अन्न पदार्थ, परंपरा, देव-दैवते, भाषा, साहित्य आहे. पण भारताचे सण, पोषाख, अन्नपदार्थ, परंपरा, साहित्य, भाषा याचे व्यवच्छेदक रूप वा वैशिष्ट्ये आपणास नाही सांगता येणार. याचे कारण आपल्या इतिहासात दडलेले दिसते. भारत देश आकाराला आला आर्यापासून. पण असे सांगितले जाते की इथे तत्पूर्वीही वस्ती होती. आर्यपूर्व भारतात मंगोल, ऑस्ट्रिक व द्रविडांची वस्ती असल्याचे सांगितले जाते. या देशात सात प्रकारच्या वंशाचे लोक आल्याचा उल्लेख आचार्यांनी आपल्या ‘हिंदू संस्कृति के अध्ययन के उपादान' शीर्षक निबंधात रिजली नामक इतिहासकाराच्या 'पीपल्स ऑफ इंडिया' ग्रंथाचा हवाला देऊन केला आहे. भारताची एक संस्कृती नसण्याच प्रमुख मूळ येथील जात, वंश वैविध्यात आहे. या जाती इथे आल्या तेव्हा त्यांच्यात संघर्ष होणे स्वाभाविक होते. असे असले, तरी कालौघात त्यांच्यात सामंजस्य निर्माण झाले. याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणून आर्य व द्रविडांचे सांगता येईल. माणूस हा मूलतः तर्काधिष्ठित जीवन जगणारा प्राणी आहे. तो फार काळ संघर्ष, विरोधात नाही राहू शकत. संघर्ष त्याची वृत्ती, तशीच समझोतापण, असे नाही की मुसलमान आल्यानंतरच भारतात अशांतता सुरू झाली. त्यांच्या आगमनापूर्वीही इथे स्थानिकात मतभेद होते व मतमतांतरेही होती. विशेष म्हणजे जात वैविध्य असूनही सर्व स्वतःला 'हिंदू' मानत. वैविध्य असूनही एकत्वाचे हे खरे कारण होय. दुसरे

साहित्य आणि संस्कृती/१०३