"माझे प्रिय पति गेले, त्यांजबरोबर मी एकटीच सर्वखास मुकलें, असें नाहीं. तरी त्यांजबरोबर, सर्व राष्ट्राचा उत्तम मित्र, बाप, आणि राज्यकर्ता नाहींसा झाला आहे." “ज्या अर्थी, परमेश्वरास हें दुःख आम्हांस देणें बरें वाटलें, त्या अर्थी तें सहन करण्याची शक्तिही त्यानेंच आम्हांस द्यावी. हें दुःख सर्वात मोठे आहे, ईश्वरेच्छा प्रबळ आहे,' ती कधींही चुकावयाची नाहीं.' " “ह्या जगामध्ये मला पुढें जें काय करावें लागेल किंवा भोगावें लागेल त्यांतून निभवण्यास मला देवानें कृपा करून साह्य करावें. म्हणून तुम्ही परमेश्वराचे प्रार्थनेंत नित्य मजविषयीं दोन शब्द बोलण्याचें स्मरण ठेवा. " " “सर्वोकडून मला सहानुभूतीचीं जीं पत्रे व निरोप आले आहेत, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानितें.” “माझा मुलगा जो आतां आपले पित्याचे गादीवर बसला आहे, त्यानें आपल्या पित्याप्रमाणेंच वागण्याचा निश्चय केला आहे, आणि तुम्ही त्याचे वडिलांवर जशी राजनिष्ठा ठेविली तशीच त्याजवरही ठेवा. अशी माझी विनंती आहे." “तुमची निष्ठावंत भक्ति माझ्या मुलावर आणि सुनेवर दृढ बसेल अशा रीतीनें ते वागतील असें मी पूर्ण जाणून आहें." ३१
पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/४०
Appearance