Jump to content

पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो दिवस ईश्वरोपासनेचा होता. म्हणून त्यांनीं धर्माध्यक्षास एक पत्र लिहिलें. त्यांतील सारांश येणेंप्रमाणें:- - "माझे भ्रतार यांस आज किंचित् बरें वाटत आहे; ही परमेश्वराची कृपा आहे; मी देवळास येत आहें, आपला उपदेश संपण्यापूर्वीच मला तेथून त्यांच्या शुश्रूषेकरितां परत यावें लागेल. म्हणून प्रार्थनेच्या पूर्वभागांतच आपण जर त्यांच्या- विषयीं परमेश्वरास प्रार्थना कराल, तर मलाही आपणाबरोबर ईशस्तवन करण्यास बरें होईल." हें पत्र विशेष मोठें नाहीं. तथापि तें कितीतरी भक्ति- युक्त आहे बरें ? यावरून परमेश्वराचे ठिकाणीं त्यांची अत्यंत भक्ति, पतिप्रेम आणि अतिउत्तम प्रकारची कर्तव्यदक्षता चां- गली व्यक्त होते. पतीस सोडून त्या एकट्या अशा बहुतकरून कधींच राहत नसत. महाराजांच्या प्रवासांत त्या नेहमीं बरोबर असत. महाराजांच्या निधनानंतर त्यांनी स्वतः प्रजाजनांस एक पत्र लिहिले आहे. तें सारांशरूपानें खाली दिले आहे. “मी शोकसागरांत, आणि माझ्यानें बोलवत नाहीं अशा दुःखद स्थितींत अगदीं बुडालें आहे. यामुळे माझें हृदय शतधा विदीर्ण झाले आहे. माझ्या या दुःखद स्थितीबद्दल माझ्या राष्ट्रांतील सर्व प्रजाजनांनीं, आणि ममताळू लहान- मोठ्या सर्व लोकांनीं, मजविषयीं जी इतकी सहानुभूति आणि कनवाळूपणा व्यक्त केला, त्याजबद्दल ह्या अशा दुःखद स्थितींतही मला त्यांचे आभार मानिल्यावांचून राहवत नाहीं." ३०