Jump to content

पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सातवे एडवर्ड महाराज हे मोठे न्यायी असून त्यांचे ठिकाणीं तीत्र व विशाल बुद्धिमत्ता वसत होती. धर्मावर त्यांची श्रद्धा अंतःकरणपूर्वक फार मोठी होती. सातवे एडवर्ड महाराजांनी सर्व राष्ट्रांचा जो एक जमाव केला, तो येथें पुन्हां सांगण्याची जरूरी नाहीं. तें एक जगांत शांतता नांदविण्याचें मोठें काम होतें. परंतु तें त्यांनी पार पाडिलें. तें धर्माचे पुरस्कर्ते या नात्यानें नसून जगांतील मोठ्या धूर्त मनुष्याप्रमाणे शेवटास नेलें. प्रजेचें कल्याण कर ण्याची काळजी हाच त्यांना छंद होता. त्यांचे लांबणीवर टाकलेलें राज्यारोहणाचें त्यांना मोठें संकट वाटलें, त्याप्रमाणेंच त्यांचे प्रजाजनांसही भारी दुःख जाहलें. बरे जाहल्यावर आ- पल्या प्रजेचीं अंतःकरणें त्यांनी आपल्याकडे ओढून घेतली. त्यांच्यावर प्रजेची फार निष्ठा होती. शांतता आणि कर्तव्यकर्म. महाराजांनी आपल्या प्रजेच्या कल्याणाकरितां, आणि आपल्या कर्तव्यदक्षतेकरितां, फार मोठी मेहनत घेतली. ते ठिकठिकाणीं प्रवास करित असत. कितीही प्रकृति बिघडली तरी कर्तव्यकर्मीत ते अंतर पडूं देत नसत. ब्यॉरिट्झ येथें गेले असता त्यांची प्रकृति कशी बिघडली, हें पूर्वी सांगितलेंच आहे, त्यामुळे ते लंडन येथील बंकिंगहाम राजवाड्यांत तारीख ६ माहे मे सन १९१० इसवी रोजीं निवर्तले. त्यामुळे त्यांची सर्व प्रजा शोकसागरांत बुडून गेली !! २७