" खरें, खरें, सुख ज्यास म्हणतात, त्या सर्व सुखाचे ते पूर्ण चाहते होते." त्यांना शिकार करण्यांत आणि भरधांव घोडा काढण्यांत आनंद वाटत असे. घरगुतीसंबंध वगैरे. महाराजांची त्यांच्या मातापित्यांशीं, कुटुंबाशीं, चिरंजीवांशीं, आणि नातवंडांशी वागण्याची पद्धति विशेष अप्रतिम आणि प्रेमयुक्त अशा प्रकारची होती. वाळपणांत त्यांना मात्र गृहव्यवस्थेचे नियम तीव्र वाटत असत. महाराज्ञी यांच्या उच्च वैभवांत हात घालणें त्यांना आवडत नसे. बाप या नात्याने ते फार कनवाळू होते. त्यांना आपल्या चिरंजीवाच्या पराक्रमाचा फार अभिमान वाटत असे. जेथें युवराज हे प्रवासास जात, तेथें त्यांच्या भाषणाचा गौरव झा -. ल्याचें ऐकून त्यांना संतोष होत असे. आजोबा या नात्यानें आपणांला सृष्टीच्या अद्भुत नियमा- प्रमाणें पोटच्या मुलापेक्षां जशीं नातवंडेंच अधिक प्रिय वाटतात, तशीं त्यांनाही वाटत होतीं. प्रिन्स ओल्याफ् हे त्यांचे फार लाडके होते. सार्वभौमराजा आणि सेनापति होऊन मोठ्या माणसांना कवाईत शिकविणाऱ्या योद्ध्यांत त्यांची गणना करण्यांत, आणि त्यांच्या बोबड्या बोलानें आपली करमणूक करण्यांत, त्यांना फार आनंद वाटत असे. २६
पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/३५
Appearance