" नेमनिष्ठ लोकाची जी पुष्कळ देवालयें रस्त्याने जातांना आपण पाहिली त्यांवरून मी असे म्हणतों." ह्रीं जीं नेमनिष्ठ लोकांचीं चुन्याचीं सफेती दिलेलीं पुष्क- ळशीं देवालयें होतीं, तीं लहान लहान अशीं असून धान्य- संग्रह करण्याच्या कोठडीहून निराळ्या प्रकारची नव्हतीं. अर्थात् तीं देवालयेंच आहेत असे ओळखून काढणें कठीण होतें. महाराज हे साधारणरीत्या स्त्रीजातीचे फारसे मोठे परीक्षक असण्याचें कांहींच कारण नाहीं. परंतु वर जो गाडींत बसून गेल्याचा उल्लेख केला आहे, त्या समयीं रस्त्यांतून जात येत असलेली स्त्रीजाती त्यांचे अवलोकनांत आली. आणि किल्ल्यांत ज्या वेळेस कोणी एक गृहस्थ किल्ल्याच्या रखवाल- दाराचें उत्कृष्ट उदाहरण घेऊन म्यॉक्स येथील राहणा-या कोळी लोकांच्या जातीविषयीं वाखाणणी करूं लागला, त्या वेळेस महाराज म्हणाले कीं " तुमच्या म्याँक्स स्त्रियाही चांगल्या आहेत." " परंतु बेट पाहण्यास ज्या इंग्लिश स्त्रिया पाहुण्या म्हणून आल्या असतील, त्या आपण म्यॉक्स स्त्रियाच आहेत असें समजणें शक्य नाहीं काय?” असें मि० हॉलकेनसाहेब म्हणाले. “असें कसें होईल ? त्यांच्यात कोणता फरक आहे, हें मला माहित आहे." परोपकार करून आपल्या आयुष्य- क्रमाचें चांगलें सार्थक करून घ्यावें असें महाराजांना वाटत असे. ते आपले आयुष्य आनंदांत घालवीत असत. आणि त्यांच्या लोकप्रियतेचें हेंच एक खरें कारण होय. २५
पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/३४
Appearance