Jump to content

पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चागत होते; असें मात्र नाहीं. उलट त्यांना मी राजा आहें, हे दाखविण्यापेक्षां मी मनुष्य मात्र आहे, हे दाखविण्यांत अत्यानंद वाटत असे. थ्याकरे या कवींनी "शेतकरी जार्ज" यांचे विषयीं जें वर्णन दिले आहे, त्या कृतीप्रमाणे ते वागत नसत. परंतु आपल्या उच्च वैभवाच्या पदवीस शोभेल अशी त्यांची वागणूक होती. त्यांनी आपल्या मॉक्स येथील दर्शनाचे वेळीं, लोकांना जवळ येऊं दिलें, व बोलण्याची मोकळीक दिली. त्या वेळीं त्यांचा चेहरा उत्साहयुक्त दिसत होता व त्याचा त्यांना उघड आनंद दिसून आला ! रामसे नांवाचे एक जवळच चिमुकले नाना प्रकारचे रंगांनी अलंकारयुक्त अर्से गांव होर्ते, त्याकडे बोट करून एकजण बोलला, "वाहवा! एवढ्या अवर्धीत एथें निशाण, झेंडे वगैरे उभारून यास विलक्षण एकाद्या मोठ्या शहराप्रमाणें शोभ- विले. " “महाराज ही तर लंडन येथील राज्यारोहणाचे दिव- सावरही ताण झाली आहे" | महाराज किंचित् हांसले, आणि त्यांनी तें मोठ्या आंनदानें कबूल केलें. . ते दिवशीं त्यांचे बरोबर पोलीस वगैरे कोणीच नव्हते. संरक्षणाचे शिपाईही अगदीच थोडे होते. फक्त एक उभ्या व हलक्या टोपीनें सुशोभित दिसत असलेले सभ्य गृहस्थ आणि खलाशी घालतात तसल्या प्रकारच्या टोप्या घात- लेल्या दोन सभ्य स्त्रिया, त्यांच्या स्नेहांकित मंडळींच्या त्यांचे २१