या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह यांचें चरित्र. भाग १ ला. शरीरसंपत्ति आणि खभाव. सातवे एडवर्ड महाराज हे आपले ब्रिटिश सार्वभौम राजस तेचे सामाजिक थोर वैभवास तृप्त असत. ते आपला काल एकाद्या सुलतानाप्रमाणें निरुद्योगिपणांत व विलासांत, कधींही जाऊं देत नसत. म्हणून त्यांचें खरूप वीरश्रीयुक्त आणि शरिराचा बांधा मजबूत दिसत असे. त्यांच्या पुढील आयुष्यांत अत्यंत स्थिरता असे. त्यांच्या डोळ्यांत सतेजतेपेक्षां गांभी- र्यच जास्त दिसत असे. ज्या मोठ्या आजाराच्या योगानें त्यांचें राज्यारोहण तहकूब ठेवावें लागलें, तो आजार गेल्यावर त्यांची शरीरसंपत्ति अति उत्तम दिसूं लागली. आणि मनाची अत्यंत शांतता व त्यांत शारीरिक उत्साहाची भर, या योगे त्यांचे ठिकाणीं प्रदीप्त घाणीदारपणा दिसूं लागला. १५ •