तिसरे दिवशीं तर या येणाच्या लोकांच्या थव्यांची लांबी ७ मैल- पर्यंत पसरली होती ! यावरून लोकांची त्यांचेवर केवढी मोठी राजनिष्ठावंत भक्ति होती याचें अनुमान करावें ! त्यांचा स्मशानविधि लंडन शहरांत तारिख २० मे सन १९९० इ० रोजीं अत्यंत सन्मानपूर्वक झाला. खरोखर एवढी स्मशानयात्रा पूर्वी कर्धी कोणाची झालेली इतिहासांत सांपडत नाहीं, व आठवतही नाहीं. तिला सुमारें विसांपेक्षा जास्त मोठमोठे राजेरजवाडे आले होते. समाज एवढा प्रचंड होता कीं, तेवढा पूर्वी कर्धीच जमला नव्हता. बाहेरचे लक्षावधि लोक आले होते, रस्त्यांत गर्दी मनस्वी झाली होती, मोठमोठ्या राजांनी आपले मानपानांकडे लक्ष दिले नाहीं. मृत्यूनंतर इतका आदरमान प्रजा आणि इतर मोठमोठे राजेरजवाडे यांनी त्यांना दिला, यावरून त्यांचेवर किती परम पूज्य भक्ति होती है चांगलें लक्षांत येईल. त्यांनी राज्यांत अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या. ते फार दयाळु होते. ते मोठे, न्यायी, चतुर आणि व्यवहारदक्ष होते. त्यांस अनाथांची व रोगग्रस्तांची फार कींव येत असे. हिंदुस्थानचे प्रजेवर त्यांची फार प्रीति होती. त्यांचे कारकीर्दीत प्रजेस फार सुख होऊन त्यांची पुष्कळ उन्नति झाली आहे. त्यांच्या चरित्राचा पुढील भाग लक्षांत यावा, म्हणून हे त्यांचें अल्पचरित्र येथें संक्षिप्तरूपाने दिले आहे. याच्या पुढील भागांत मि० हॉलकेनसाहेब यांनी सार्वभौम बाद- शाह सातवे एडवर्ड यांचें जें त्रोटक चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यांतील मजकूर सारांशरूपानें दिला आहे. १३
पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/२२
Appearance