Jump to content

पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यामुळे त्यांचे सर्व प्रजाजन त्यांस धन्य धन्य म्हणत आहेत. आणि "व्हिक्टोरिआ महाराणी ह्या परोपकारी आणि सातवे एडवर्ड बादशाह हे शांतिस्थापक असे सर्वत्र अत्यादरपूर्वक म्हणत आहेत." त्यांची स्वारी ब्यॉरिट्झ येथे गेली असतां त्यांना पडसे आलें. त्यापासून त्यांना सूक्ष्म श्वासोच्छ्वासनळीचे कफाचा आजार होऊन त्यापासून त्यांचें तारिख ६ माहे मे इ० स० १९९० रोजी रात्रीं देहावसान झालें !! त्यांच्या मृत्यूची वाती ऐकून त्यांची सर्व प्रजा अत्यंत शोकसाग- रांत बुडून गेली ! हिंदुस्तानच्या सर्व प्रजाजनांनीं मोठमोठ्या सभा भरवून अत्यंत दुःख व्यक्त केलें, इतकेच नव्हे, पण प्रत्यक्ष त्यांच्या नेत्रांवाटे घळघळां दुःखानु बाहिले. आपल्या प्रभूबद्दल प्रजाजनांना इतकें अनिवार दुःख, व शोक झाल्याचे उदाहरण इतिहासांत क्वचि तच सांपडेल | हाय ! हाय ! असे दयाळू प्रभू इहलोक सोडून गेल्यानें आमचे एक अतिउत्तम, प्रजेचे दयाळु, सुखदुःख जाणणारे बाप, नाहींसे झाले ! यांत तिळमात्र शंका नाहीं । त्यांचे शव तारीख १७ माहे मे इ० सन १९९० रोज वेस्ट- मिन्स्टर हाल येथे मोठ्या सन्मानाने नेऊन ठेविलें. दुपारी चार वाजतां लोकांस त्यांचे दर्शन व्हावे म्हणून दरवाजा उघडा केला. हजारों लोक येऊन त्यांचे दर्शन घेऊन गेले. रात्री १० वाजतां दर- बाजा बंद केला. त्या रात्रीस पाऊस बराच पडत होता. तरीही हजारों लोक तसेच पावसांतच सर्व रात्रभर दरवाजा केव्हां उघडेल, आणि आम्हांस त्यांचे दर्शन केव्हां होईल, याची सारखी वाट पाहात बसले होते. दुसरे दिवशीं सकाळी सहा वाजतां दरवाजा उघडल्यावर एक- सारखा लोकांचा थवा त्यांच्या दर्शनास येत होता, व ते दिवशींही सर्व लोक रात्रभर तसेच बसले होते. १२