ते आपले प्रपितामह तिसरे जार्ज ह्यांचेप्रमाणं कृषीवृत्तींत अथवा शेतकीचे कामांत फार निपुण होते. सांडरिंगहाम येथे त्यांची एक हजार एकर उत्तम प्रकारची जमीन आहे. तेथें त्यांचीं कुळे आहेत, तेथें नाना प्रकारच्या उत्तम उत्तम सुंदर घोड्यांच्या जाती, पाळींव शिकविलेलीं शोभिवंत अप्रतिम कुर्त्री, तसेंच गाई, बैल, आदिकरून नाना प्रकारच्या जातींच्या जनावरांचे त्यांचे कळप आहेत. त्या सर्वांची अति उत्तम प्रकारची बरदास्त ते ठेववीत असत. त्यांची जोपासना व वाढ करविण्याचे कामांत ते फार कुशल असत. त्यांच्या बागेत उत्तम उत्तम प्रकारची मधुर फळे ते पिकवीत असत. आणि त्यांबद्दल त्यांची फार ख्याति झालेली होती. ते आपल्या कुळांना फार ममताळूपणाने वागवीत असत. त्यांच्या दुःखाच्या प्रसंगी त्यांना साह्य, अडचणीचे प्रसंगी मदत, कोणी दुखण्यांत पडल्यास औषधोपचारही करवीत असत. त्या सर्वांवर ते नेहमीं दया आणि ममता करून त्यांच्या कामांस प्रोत्साहन देत असत. त्यांची जनावरें प्रर्दशनांत उत्तम प्रकारचीं व पहिल्या वर्गाची ठरून त्यांना अनेक वेळां मोठमोठालीं बक्षिसे मिळालीं होतीं. युवराज असतांना एकंदर त्यांचें उत्पन्न सुमारें ६१०६००० पौंड होतें. त्या मानानें त्यांचा खर्चही फार होता. नुसत्या तारा आणि पोष्टाचीं पाकिटें ह्यांसच सुमारे एक लक्ष रुपये लागत असत. त्यांनीं "ऑस्पिटल फंड" उभारिला होता. रोगग्रस्तांस किंवा दवाखान्यांत राहून जे गरीब व अनाथ लोक औषधोपचार घेत असत, त्यांना ते मदत करीत असत. दवाखान्याकडे त्यांचे फार लक्ष असे. दवाखान्यांत जाऊन तेथील रोगग्रस्त लोकांस दया, माया आणि सहानुभूति दाखवून त्यांना यथायोग्य ते द्रव्यसाह्य करित असत. ८
पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/१७
Appearance