वरचें दुखणें गेलें. ते समयीं त्यांच्या पत्नीने त्यांची सारखी रात्रंदिवस शुश्रूषा केली. त्या वेळी त्यांनीं धर्मोपदेशकांस एक लहानसे पत्र लिहिले. त्याचा सारांश असा — "माझे भ्रतार यांना आतां परमेश्वरकृपेंकरून किंचित् बरें आहे, म्हणून मी देवाचे प्रार्थनेस देवळांत येत आहे. परंतु त्यांच्या शुश्रूषेकरितां मला प्रार्थना संपण्यापूर्वीच परत जावें लागेल. तरी प्रार्थनेच्या पूर्वभागांतच जर आपण त्यांच्या आरोग्याविषयी दोन शब्द बोलाल तर मलाही प्रार्थना करण्यास बरें होईल." युवराज या दुखण्यांतून उठल्याबद्दल राजघराण्यांतील सर्व मंडळी युवराजांसह मोठ्या आनंदानें मिरवीत देवळांत प्रार्थनेस गेली. त्या मिरवणुकींत तीस हजार मुले राष्ट्रगीत गात होतीं. आणि परमे- श्वराचे आभार मानण्याकरितां तेरा हजार लोक देवळांत प्रार्थनेस जमले होते ! इसवी सन १८७५ सालीं ते आपल्या देशांतही आले होते. त्या वेळी लोकांनी त्यांचा फार गौरव करून अति उत्तम प्रकारचें आदरातिथ्य केलें. त्यांनीं जयपूर, मुंबई, मद्रास, कलकत्ता, दिल्ली वगैरे नामांकित मोठमोठीं शहरे पाहिलीं. त्यांची स्वारी नेपाळांतही गेली होती. बोटींतून ते मुंबईस उतरले, तेथें त्यांना मुख्य मुख्य संस्थानिक आणि इतर प्रसिद्ध लोक भेटले. युवराज प्रत्येकाश मोठ्या सौज- न्यानें आणि हर्षयुक्त प्रेमानें बोलत असत. तेणेंकरून सर्व संस्था- निकांना व इतर मंडळींना अत्यानंद झाला. त्यांनी जयपूर येथें शिकार करून प्रथम वाघ मारिला ! आणि त्या- नंतर त्यांनी नेपाळांत एका दिवसांत सहा वाघांची शिकार केली ! रविवारी ते शिकार करित नसत, व तो दिवस पवित्र असा पाळीत असत. ७
पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/१६
Appearance