Jump to content

पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सापडतात. कुटुंबरचनांमध्ये सर्व भारतभर आढळणारे जातिनिष्ठ विशेष आणि प्रादेशिक विशेष एक मुद्दा स्थिर करितात. तो म्हणजे हिंदुस्थानात आपली संस्कृती दुस-यावर लादण्याइतका अवसर मिळालेलाच नाही. तसा निर्विवाद लष्करी जय कुणाचाच झालेला नव्हता. आर्यभटांनी संपूर्ण भारतावर गुलामगिरी लादली, या अर्ध-राजकीय, अर्ध-सामाजिक भूमिकेचा भारताची ही सामाजिक व्यवस्था निरास घडवून आणते. खरे तर हेही विचारावयाला पाहिजे की, वर्णव्यवस्था आर्यांची तरी होती काय? वर्णव्यवस्थेचे जर आपण बारकाईने परीक्षण करु लागलो, तर ती शतीप्रधान स्थिर संस्कृतीची व्यवस्था आहे, पशुपालनाच्या अवस्थेतील भटक्या टोळ्यांची व्यवस्था नाही. ही गोष्ट उघड होईल. शेतीप्रधान स्थिर सस्कृती निर्माण झाल्याशिवाय वैश्य आणि शूद्र हा तुकडाही पडू शकत नाही. आणि लढण्याचे काम एका वर्गाच्या हवालीहि करिता येत नाही. मटक्या टोळ्यांमध्ये सर्वांनाच लढाऊ असणे भाग असते. आर्यांचे हिंदुस्थानातील जागमन हे एका सुव्यवस्थित संस्कृतीचे, एका स्थिर संस्कृतीचे भारतात जागमन नव्हते. ते भटक्या टोळ्यांचे आगमन होते. या भटक्या टोळ्या कमान हजार वर्षे तरी टोळ्याटोळ्यांनी भारतात येत होत्या. त्यांपैकी आर्य या अनार्यांशी लढत होत्या, आपापसांत लढत होत्या. आधी येऊन स्थर झालेल्या टोळ्या नव्याने येणा-यांशी लढत होत्या. या नानाविध याना एकच-एक देवताही असण्याचा संभव नाही, त्यांची एकच-एक व्यवस्था असण्याचा संभव नाही, आर्यलोक भारतात उत्तरेकडून आले. कडून येताना जे प्रदेश वसवीत ते आले, त्या प्रदेशांत त्यांनी वर्णव्यवस्थेचे पराष मागे सोडलेले दिसत नाहीत. आर्य भारतात आल्यानंतर येथे या संस्कृतीला किमान स्थिरता आणि किमान समृद्धी मिळाल्यानंतर पणव्यवस्थेचा विचार त्यांना करता येणे शक्य होते. अशा वातावरणात यवस्था ही वैदिक आर्यांची व्यवस्था होती, हे पटणे कठीण आहे. खरी अशा आहे की, भारतात येण्यापूर्वी वेदांची फारशी सूक्ते रचिली गेली सण्याचा संभव नाही. सिंधूच्या परिसरात रचिल्या गेलेल्या वैदिक सूक्तांत १५१ ।। संस्कृती ।।