पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्या धोरणातील योजना सुधारणा
१. दारिद्र्यरेषेखालील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘इंदिरा गांधी वृद्ध नागरिक निवृत्तिवेतन योजना लागू करणे व ती मासिक रु. १०००/किमान करणे.
२. वरील योजनेत अत्याधिक वृद्धांचा (Oldest Old) प्राधान्यक्रमाने अंतर्भान करणे.
३. दारिद्र्यरेषेखालील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘नागरी पुरवठा योजना (अन्नपूर्णा)चा लाभ देणे.
४. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता औषधोपचार खर्च कक्षात घेऊन आयकरात अधिक सूट देण्याचा विचार करणे.
५. आरोग्यासंबंधी विविध राष्ट्रीय योजनांत ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देणे.
६. ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्रे, ‘आशा' कर्मचारी यांच्या साहाय्याने वर्षातून दोनदा तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे.
७. ज्येष्ठांचे त्यांच्या कुटुंबातील संगोपन आणि शुश्रूषा सेवांची शाश्वती निश्चित करणे.
८. ‘राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना अधिकांपर्यंत पोहोचावी म्हणून विविध निम्न उत्पन्न गटांना सवलत दराने (Subsidy) ती उपलब्ध करून देणे.
९. अल्झायमर, डेमिनिशियासारख्या मनोविकारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना निदान व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे.
१०. राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेतून नेत्रविकारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना साहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून देणे.
११. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखी व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञान साधने, सुविधा व नेटवर्ककेंद्रित सोयी निर्माण करणे व पुरविणे.

१२. ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय आरोग्य योजना' (NPHCE) देशातील सर्व जिल्ह्यांना लागू करणे.

सामाजिक विकासवेध/९०