पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिला अधिकार चालणाच्या माणसाचा असतो. कोणतीही गोष्ट करताना क्षणभर थांबा, विचार करा आणि मगच कृती करा. ग्रहणाचा आणि जीव जीवनाचा काहीच संबंध नाही. तुम्ही निसर्गावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करा. अग्नी' हा माणसाच्या विकासाचा पहिला वैज्ञानिक शोध होय. अंतर्मनाच्या जोरावर तुम्ही जगा, असे विज्ञान आपल्याला सांगते. अंतर्मन आणि अंतअवाज ही सर्वांत प्रभावी गोष्ट आहे; कारण ती तुमची आहे. आपले मन, मत आणि विचार यांचा फार कमी विचार करतो. चिंता करून आपण एका अर्थाने गुलामीचे जीवन जगत असतो. विज्ञान आपल्याला मानसिक स्वातंत्र्य देते. सर्व भौतिक सुविधांचा पाया विज्ञानच आहे. विकासाचा मार्ग विज्ञान आहे, हे कळल्यानंतर इष्ट काय ? अनिष्ट काय ? यांचा विचार करायला हवा. जेव्हा आपण धर्मसत्ता, राजसत्ता, दैवसत्ता सोडून स्वतंत्र विचार करू, तेव्हाच ख-या अर्थाने नेहरूंचे स्वप्न साकार होईल. विज्ञाननिष्ठा ही एक प्रक्रिया आहे. विज्ञान हा आपला जीवनमार्ग, जीवनशैली झाली पाहिजे. आपण वेगवेगळ्या कारणांनी दैववादातून मुक्त झालेलो नाही. आज आपली स्पर्धा चीनशी आहे; कारण चीनचे लोक सगळ्या कर्मकांडातून बाहेर आलेले आहेत. जगातील सगळे प्रगत देश विज्ञानाच्या जोरावर पुढे आलेले आहेत.

सामाजिक विकासवेध/८७