पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होण्याची शक्यता आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, तोवर भारतातील ५९२ दशलक्ष, (Million) कार्यक्षम असतील. भारत सरकारतर्फे युवक विकासावर प्रत्यक्षतः ३७00 कोटी रुपये, तर अन्य योजनांतून ५५000 कोटी असे सुमारे ९0,000 कोटी रुपये खर्च करण्यात येत असतात. यात शिक्षण, अन्न, सेवायोजन, आरोग्य, कुटुंब कल्याण, क्रीडा इत्यादींचा अंतर्भाव असतो. याशिवाय राज्य सरकार, स्वयंसेवा संस्था ही युवक विकासावर मोठा निधी खर्च करीत असतात.
 नवीन युवा धोरण-२०१४ ची जी उद्दिष्टे (Objectives) निश्चित करण्यात आली आहेत, त्यांनुसार युवकांतील सर्व क्षमता, कौशल्यांच्या सर्वंकष विकासातून युवा सबलीकरण करण्याचे धोरण आहे. जेणेकरून भारतीय समाजात युवकांना त्यांच्या हक्कांवर आधारित स्थान व सन्मान मिळू शकेल. युवकांचा कार्यशक्तीच्या रूपात विकास करून त्यांना देशाच्या शाश्वत विकासाचे साधन बनविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. भविष्याची आव्हाने पेलण्याची क्षमता युवकांत निर्माण करण्याच्या उद्दिष्टानुसार भावी युवा पिढी समर्थ व सुदृढ बनेल हे पाहिले जाणार आहे. देशात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागावी म्हणून युवकांत मूल्यांची रुजवण व समाजकार्यातील त्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सर्व स्तरांवर युवकांत जबाबदार नागरिकत्वाची भावना कशी विकसित होईल, हे पाहिले जाणार आहे. वंचित, उपेक्षित, युवकांच्या कल्याण व विकासाद्वारे त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

 वरील उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी खालील ११ क्षेत्रांत भविष्यकाळात युवक विकासाचा कार्यक्रम अंमलात आणण्याचे धोरण आहे - १) शिक्षण, २) सेवायोजन व कौशल्य विकास, ३) उद्योजकता विकास, ४) आरोग्य व आरोग्यदायी जीवनशैली विकास, ५) क्रीडा, ६) सामाजिक बांधीलकी, ७) समाजकार्य सहभाग, ८) राजकारण व प्रशासनातील सहभाग वाढ, ९) युवक उपक्रम, १0) समावेशन (Inclusion), ११) सामाजिक न्याय. शिक्षणाच्या संदर्भात युवक क्षमता विकासास व गुणवत्ता संवर्धनास प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवाय कौशल्यविकासावर भर देऊन युवकांमध्ये जीवनभर निरंतर शिकत राहण्याच्या प्रवृत्तिवर्धनाकडे विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. आज भारतातील ५0टक्के युवक स्वयंरोजगार करतात. नोकरी करणा-या युवकांची संख्या ७0 दशलक्ष आहे. ती १५टक्के भरते. याचा अर्थ उर्वरित ३५ युवक बेकारीला तोंड देत असतात. हे लक्षात घेऊन

सामाजिक विकासवेध/७१