पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डी. बर्मननी ऐकण्याला नजाकत दिली. किशोरकुमारनी कानांना हसायला शिकवलं, तर लता मंगेशकरनी रडायला (ऐ मेरे वतन के लोगों!)
 पूर्वी लाऊड स्पीकर नव्हते. कर्णा घेऊन बोललं जायचं. जाहिरातीसाठी कण्र्याचाच वापर असायचा. ज्याचा आवाज मैदानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचायचा तो नेता व्हायचा! उदाहरणार्थ आचार्य अत्रे! गांधीजींना, नेहरूंना लाऊड स्पीकर लागायचा. गावात एकच लाऊड स्पीकर असायचा. त्याचा भाव मोठा. अगोदर स्पीकर ठरवायचा, मग वक्ता! सभेच्या आधी लाऊड स्पीकर ठरवायचे. तेच नाटक, गाणं, तमाशा, मेळा, पोवाडा, कार्यक्रम, व्याख्यानांचं. स्पीकर बॅटरीवर चालत. ते ऐकताना आश्चर्य वाटायचं. आवाज मोठा कसा होतो?
 रेडिओ आधी आला, मग टेपरेकॉर्डर ! पण रेडिओनं समाजाला ऐकायची समज व संस्कार दिले. रेडिओने भजन, भारूड, भाषण, सारं ऐकायला शिकवलं, अमीन सयानीला अमर केलं रेडिओने! उलटही म्हणता येईल ! रेडिओची सिग्नेचर ट्यून (रेडिओ सुरू होतानाची ट्यून ), वंदे मातरम्, बातम्या यांनी माझी पिढी ऐकत कानसेन, तानसेन झाली... मधल्या काळातील पिढीनं रेडिओ ऐकणं सोडलं अन् ती मानसेन झाली. आता परत ती एफ.एम.मुळे कानसेन झाली; पण त्यांचे कान एकारलेले झालेत. त्या कानांना अभिजात संगीत कळत नाही. ते शब्द, काव्य, अर्थ हरवून केवळ ताल, नाद, संगीत, ऐकते, डोलते, नाचते. गाणं म्हणजे विचार असतो हे संपलं. मोबाईलधारक पिढी स्वत:चंच ऐकते. त्यामुळे आत्ममग्न! आत्मरत ! बसमध्ये शेजारी डॉ. अब्दुल कलाम, अण्णा हजारे, लता मंगेशकर बसलेल्या असल्या तरी ते त्यांच्या गावी नसते. अशी आत्ममग्नता घाण्याच्या बैलाची!
थेट, नेट, इंटरनेट

 असं असलं तरी या मोबाईल, मोटर, इंटरनेट, जनरेशनचं मला मोठं अग्रुप आहे खरं. लहानपणी आम्ही बाल हनुमानाची एक कथा ऐकायचो. तो हनुमान म्हणे जन्मल्या-जन्मल्या सूर्य गिळायला निघाला होता. ती हनुमान उडी घेऊनच नवी पिढी जन्मते. जन्मत:च ती कॉम्प्युटर सॅव्ही असते. छोटी-छोटी बालवाडीत जाणारी मुलं, प्ले ग्रुपमध्ये जाण्यापूर्वी डिजिटल लिटरेट असावीत असा त्यांचा व्यवहार. घरातली नातवंडं मी पाहतो. मोबाईल ते न शिकविता सफाईदारपणे हाताळतात. टी.व्ही.चा रिमोट, चॅनल्सची माहिती त्यांना आपोआप कळते. व्हिडीओ गेम्स ती स्वत:च शिकतात. तेच कॉम्प्युटरचं. या पिढीचं वर्णन मी थेट पिढी' असं

सामाजिक विकासवेध/६८