पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आधारावर निर्णय घ्यायचा. अंतःस्फूर्त ते नैतिक असतं. अंत:प्रेरणेत विकास ऊर्जा अधिक; म्हणून मनाचा पिंगा महत्त्वाचा.
 स्त्रीस प्रेरक बदलाचं पर्यावरण द्यायचं तर पालकांनी मालक व्हायचं थांबवायला हवं. नवरा मित्र होईल तो सुदिन ! स्त्री अगोदर 'माणूस' असते. नाती नंतर येतात. आपण तिला वेगवेगळ्या चक्रात गुंतवून... जात, धर्म, भावना, बंधन, नाती, कर्तव्य यांत अडकवून तिला ‘हक्कवंचित' करत असतो, हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच तिच्यात प्रेरक बदलांचा न संपणारा प्रवास, प्रवाह सुरू होईल. त्यासाठी गरज आहे स्त्रीविषयक पारंपरिक संकल्पना पुसून तिच्याठायी ममत्वपूर्ण जीवन, पाशमुक्त जगणं काय असतं हे रुजवणं आवश्यक. या तर प्रथम आपण बदलू, मग ती आपण होऊनच बदलेल. प्रेरक बदल म्हणजे अंत:स्फूर्त प्रेरणांनी झालेला कायाकल्प ! तो स्त्रीस स्वतः करू द्या. तुम्ही बना मूक निरीक्षक !

सामाजिक विकासवेध/५४