पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देश मानला जाऊ लागला आहे. नगरोत्थान म्हणजे रस्तेविकास, संरचना विस्तार नाही तर वंचितविकास, मानव संसाधन विकास, मनुष्यवस्ती विकास होय. हे लक्षात घेऊन कोल्हापूरच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. संस्थानी काळात ज्या गोष्टी पाहिल्या जात होत्या, तितक्या जरी वंचितांसंबंधी पाळल्या तरी ‘रायझिंग कोल्हापूर' हे कोल्हापूर शायनिंग ठरेल. त्यासाठी प्रत्येक कोल्हापूरकराचं मन राजर्षी शाहू छत्रपतींसारखं उदार, पुरोगामी, सर्वसमावेशक हवं आणि संवेदनक्षम भविष्यलक्ष्यीही!

सामाजिक विकासवेध/२५