पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/180

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो. सगळे वाहनधारक त्या पट्यावर आक्रमण करून उभे असतात. पादचारी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतो. विदेशात तर माणसाळलेली कुत्रीपण रहदारीचे नियम पाळताना मी पाहिलीत. पादचारी प्रथम' न्यायाने ते आपले वाहन नंतर जाऊ देतात. हॉर्नचे तर विचारू नका. मागून येणारी दुचाकी, मोटार अ‍ॅम्ब्युलन्ससारखी हॉर्न वाजवित पुढे जाते. हॉर्न मुळात अपवादाने व आणीबाणीच्या परिस्थितीत वाजवायचा असतो, हे आपणास केव्हा कळणार? बस स्टैंड, रेल्वे स्टेशन, बँक, पेट्रोल पंप इथे ओळीचा साधा नियम पाळणे आपल्या किती जिवावर येते. अगदी नाइलाज झाला तर आपले मन मारून ओळीत उभे राहणे, याला का सभ्यता म्हणायची? रिकामी बस लागली की मी पाहतो. चाळीस बैठकांची बस. वीस लोकांचीच गर्दी; पण पुढे जाण्याची अहमहमिका अशी की जो पहिला जाईल त्याला बहधा मोफत प्रवासाचा पास मिळणार आहे! एस. टी., रेल्वे, बँक, पेट्रोल पंप यांनी अशी योजना जाहीर करून पाहावे, पहिल्या येणा-यास प्रवास मोफत, एक हजाराचा चेक बक्षीस, पाच लिटर पेट्रोल मोफत. आपण भारतीय एकाला पण मोफत बक्षीस मिळवू देणार नाही. टोकाचा संघर्ष होईल. आपण सुसंस्कृत झालोत का नुसता विचार करून पहा. संयम, सभ्यतेचे दुसरे नाव शहाणपण असते.
 काही वर्षांपूर्वी रोटरी क्लबची सिनेमा थिएटरमध्ये एक जाहिरात असे. त्यातील वाक्य अजून माझ्या लक्षात आहे, चौकात कुस्ती नको.' इथल्या जयेंद्र पब्लिसिटीने काही वर्षांपूर्वी आपल्या ऑफिससमोर होर्डिंग लावले होते, ‘स्टेशन रोड ओलांडणाच्यासाठी शुभेच्छा!'. हे सर्व आपल्या अव्यवस्था, बेशिस्त, बेफिकिरीचे पंचनामेच नाहीत का? भारतीय पुरुषांचे भर रस्त्यावर लघवीस उभे राहणे यात आपणास काहीच कसे वावगे वाटत नाही ? ‘इंडिया टुडे' या नियतकालिकाने एक विशेषांकच काढला होता. त्याचे शीर्षकच होते मुळी ‘अग्ली इंडियन' (असभ्य भारतीय). त्यात आपल्या वरील साच्या असभ्यपणाची छायाचित्रे होती. ए. टी. एम. मशीन केबीच्यानमध्ये मी चिठ्या/कपटे टाकण्यासाठी कचरा कुंडी (डस्टबिन) असून त्यात निरुपयोगी कागद, कपटे, पावत्या का पडू नये? वापरणारे शिक्षित असतात ना? शाळा, महाविद्यालयांच्या आवारात कचरा का असावा, दिसावा? असे प्रश्न पडण्याचे दिवस येऊन ठेपले आहेत.
 सिनेमा थिएटर, उपाहारगृह येथील आपले वर्तन आपण माणसाऐवजी जनावर असल्याचे नाही का सिद्ध करीत? शिट्या, हिडीस टोमणे, बीभत्स हंबरणे हे माणसाचे लक्षण खचीतच नव्हे! थाळी, प्लेटमध्ये अन्न टाकणे,

सामाजिक विकासवेध/१७९