पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. त्यांनी कचरा कसा तयार होतो, कुठे कुठे होतो, त्याचे प्रकार (ओला, सुका, पुनर्वापर करता येणारा, सजावटीस उपयोगी इ.) पुढे मग त्यांनी स्वच्छतेची जी व्याख्या सांगितली त्या व्याख्येत विदेशातील साच्या स्वच्छतेचे रहस्य सामावलेले होते. बाई म्हणाल्या, ‘कचरा न करणे म्हणजे स्वच्छता. आपल्याकडे केलेली घाण बाहेर, प्रसंगी दुस-याच्या दारात टाकणे, ढकलणे म्हणजे स्वच्छता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांच्या प्रवासात प्रत्येक गांधी जयंती सफाई कार्यक्रमात खर्ची घालून देश स्वच्छ, सुंदर होऊ न शकण्याचे कारण स्वच्छताविषयक मूळ संकल्पनेत दडलेले आहे.
 कोणत्याही देशाच्या नागरी जीवनाचा पाया असतो शिस्त. शिस्त येते नियमपालनातून त्याचे बाळकडू लहानपणीच पाजायचे असते. युरोपातील अनेक देशांत वाहन चालविण्याचे संस्कार, शिस्त शाळेत शिकविली जाते. शाळेत चक्क ‘ट्रैफिक पार्क' असतो. ट्रॅफिक पोलीस शाळेत येऊन ट्रैफिक नियम शिकवितात, कायदे सांगतात. शिक्षेपेक्षा लोकशिक्षणावर भर असतो. अठरा वर्षांच्या आत व दहा वर्षांनंतर रस्त्यावर फक्त सायकलच मुलांना चालविता येते. अठराव्या वर्षांखालील मुला-मुलींनी मोटारसायकल, स्कूटर, मोपेड चालवली तर मालकाला तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंड अशा शिक्षेची आपणाकडे तरतूद आहे; पण अशी शिक्षा झाल्याचे आपणाकडे अपवाद. कायद्याचे राज्य दोन मार्गानी येते. एक पालनाने व दुसरे अंमलबजावणीने. आपणाकडे दोन्ही आघाड्यांवर अनास्था व उपेक्षेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले आढळते. कायदापालनाचे आदर्श लोकप्रतिनिधींनी रूढ करायचे असतात. त्यांच्या ड्रायव्हरने एकदा अनवधानाने सिग्नल तोडला, तर त्यांनी देशाची म्हणजे क्षमा मागितली व दंड करणाच्या ट्रैफिक पोलिसाला गौरविले. आपल्याकडे किरण बेदी नवी दिल्लीत पोलीस अधिकारी असताना त्यांनी ट्रैफिकला शिस्त आणली. त्या काळात त्या गाड्या ओढून नेत म्हणून त्यांना किरण बेदी न म्हणता ‘क्रेन बेदी' म्हटले जायचे. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची गाडी कायदाभंग केला म्हणून ओढून नेली. तर लगेच त्यांची बदली तुरुंग अधिकारी म्हणून केली. एका अर्थाने त्यांना तुरुंगातच डांबण्यात आले. कशी येणार आपणाकडे शिस्त, नियमपालनाचे संस्कार?

 कोणत्याही देशाचे नागरी चारित्र्य ओळखले जाते ते त्या देशाच्या कार्यसंस्कृतीवरून. मी सन १९९६ मध्ये जपानमध्ये होतो. तिथे लोकांची कामाची शिस्त म्हणण्यापेक्षा कामावरील प्रेम मी पाहिले व अनुभवले आहे. दहा-पंधरा दिवसांच्या आखीव-रेखीव कार्यक्रमात कुठे मला दिरंगाई,

सामाजिक विकासवेध/१७५