पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फिरत होतो. त्या छोट्या भटकंतीतून मला जे लोकशिक्षण लाभले, ते आपण सर्वांनी वाटून घेतले पाहिजे. मी तिथल्या प्राथमिक शाळेत शाळा सुरू होण्याच्या वेळेस अचानक पोहोचलो होतो. सोबत मेझनिवासी माझी यजमान होती. तिथे मला शाळा पाहायचीय म्हणून मुख्याध्यापकांना समजावले. त्यांनी अनिच्छेनेच परवानगी दिली. त्यांना भीती की आपल्या देशाबद्दल चुकीचा संदेश जगभर पसरायला नको. शाळा पाहत मी एका वर्गात गेलो. त्या वर्गशिक्षिका वर्ग तयार करीत होत्या. ते पाहून मला आश्चर्य वाटले. वर्ग सुरू होण्यापूर्वी अर्धा तास शिक्षक तो तयार करण्यास वेळ देतात. त्यांच्या तयारीकडे मी बारकाईने पाहत होतो. लक्षात आले की त्या इतक्या सुंदर वर्गात सर्वत्र केर, कचरा, कपटे, केसांचे गुंते सर्वत्र पसरवित आहेत. तो कचरापण त्यांनी विचारपूर्वक कष्टाने गोळा केलेला होता. न राहून मी त्या बाईंना विचारले की तुम्ही काय करता आहात ? तर म्हणाल्या की शिकवायची तयारी करते आहे, 'I am preparing my class' जिज्ञासेने मी विचारले की काय शिकविणार आहात ? तर उत्तरली की 'Cleanliness'. स्वच्छता शिकवायला त्या वर्ग घाण करीत होत्या. मला उगीच भारतातील शाळा आठवत होत्या. मी मनातल्या मनात त्यांना सांगत होतो की आमच्याकडे एक तर वर्गाची वा शिकवायची तयारी करावी लागत नाही. एकदा इन्स्पेक्शन किंवा गॅदरिंग, स्वच्छता स्पर्धेला वर्ग सजविला की तो परत काही असा बाका प्रसंग येईपर्यंत आम्ही त्याला हात लावत नाही. दुसरे असे की आमचे शिक्षक शिकवण्यात इतके तरबेज असतात, तयारीचे असतात की त्यांना एकदा डी. एड, बी. एड झाले की परत कशाचीच तयारी करावी लागत नाही.

 एव्हाना मुले, मुली एक-एक करीत, जमत वर्ग भरलेला. बाईंनी सर्वांना हातात हात धरून फेर धरायला लावला. त्याही त्या फेरात उभ्या होत्या नि आम्हालाही त्यांना फेरात सामावून घेतले. मग त्यांनी सर्वांच्या हातावर एक एक चॉकलेट ठेवलं. मग खायला सांगितले. सर्वांचे खाऊन झाल्यावर विचारले. चॉकलेट खाऊन काय उरले. सर्वांनी उत्तर दिले रॅपर्स, कागद, वेष्टन इ. एव्हाना काहींनी ते इकडेतिकडे टाकले होते. त्यात आम्ही आघाडीवर होतो. काहींच्या हातात ते अजून होते. बाईंनी विचारले, “याचं काय करणार तुम्ही?' कुणी काय, कुणी काय सांगितले आम्हाला काही समजलं नाही. मग त्यांनी मुलांना समजावलं की 'Raper is the west, dust कुठे टाकायचं? तर डस्टबिन, कचराकुंडीत वर्गात एचरा पेटी, डबा होता. तो आपल्या आख्ख्या शाळेत शोधून मिळायचा नाही. खरी गंमत पुढेच

सामाजिक विकासवेध/१७४