पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. वयोश्रेष्ठांसाठी कार्य करणाच्या स्वयंसेवी संस्थांना ग्रामीण भागात कार्य करण्यास प्रोत्साहन देऊन आर्थिक अनुदान देणे.
९. प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, बँक, विमा, दळणवळण, पर्यटन सुविधा वयोश्रेष्ठानुवर्ती करणे.
१०. वयोश्रेष्ठ निवृत्तिवेतन ग्रामीण भागातील प्रत्येकास लाभार्थी बनविणारे करणे.
 अशा गोष्टी केंद्र व राज्य सरकारांनी समन्वयाने व प्राधान्याने सामाजिक सुरक्षा व सामाजिक न्याय अशा दोन्ही पद्धतींनी आखून क्रियान्वयन केले तरच वयोश्रेष्ठांचे जीवन सुसह्य व समृद्ध होईल. त्यासाठी प्रसंगी केंद्र व राज्यस्तरावर ग्रामीण वयोश्रेष्ठ संरक्षण व विकास मंत्रालय स्थापन करता आले तर ते जागतिक स्तरावर अनुकरणीय पाऊल ठरेल.

◼◼

सामाजिक विकासवेध/१७१