पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विशिष्ट काळात (सायं. ६ ते रात्री १२) लैंगिक क्रिया न घडणे हेच त्यांना वेडेपिसे करणारे ठरते. शिवाय त्यांचे दिनचक्र. आपली झोप मोडायच्या वेळी रात्री १२ ते २ च्या दरम्यान त्या झोपतात. दुपारी १२ त्यांचा दिवस उजाडतो. बिअर, बिर्याणी हे त्यांचं रोजचं खाणं-पिणं. नटणं, मुरडणं, बसण्याची ठेवण ही स्त्रीसंकोचाच्या बरोबर विरुद्ध. तेच त्यांचं जगण्याचं भांडवल असतं.
बालिकांचे लैंगिक शोषण
 भारतात बालिकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रमाणात निरंतर वाढ हे आपल्या सामाजिक अस्वास्थ्याचे लक्षण म्हणावे लागेल. सन २०१४ साली आपल्या राष्ट्रीय अपराध नोंद अहवालात हे प्रमाण ६५टक्के वाढल्याचे नमूद आहे. भारताच्या मुली व महिलांच्या अनैतिक व्यवहारात ७६टक्के वाढ कशाचे निदर्शक आहे? गेल्या दशकात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन बालिकांची विक्री व आयात पाहता, हा देश या व्यवसायाचे आगर बनतो आहे, असे दृश्य आहे. विशेषत: बांगला देश, नेपाळसारख्या सीमावर्ती देशांतून या व्यवसायासाठी मुलींच्या आयातीचे प्रमाण मोठे आहे. वेश्या व्यवसायाबरोबर लैंगिक पर्यटन (Sex Tourism) व लैंगिक चित्रणार्थ (pornography) मुले व मुलींचा वापर व्यवसाय म्हणून वाढतोच आहे. अशी सन २०१४ साली ८०९९ नोंदली केलेली प्रकरणे याची भयावहता लक्षात आणून देतात. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे -
अ.क्र.  वर्ष      तपशील/कारणे   नोंदणीकृत गुन्ह्यातील संख्या
  २०१४  अनैतिक व्यापार अधिनियम    ३३५१
  २०१४  मानवी वाहतूक        २६०५
  २०१४  कुंटणखान्यातून सुटका    २०२५
  २०१४  अल्पवयीन बालिका विक्री     ००८७
  २०१४  वेश्या व्यवसायार्थ खरेदी        ००१८
  २०१४  अनैतिक व्यवसायार्थ आयात   ००१३
           एकूण    ८०९९
 हे गुन्हे भारतातील सर्व प्रांतंत झाल्याचे दिसून येते. त्यातही तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र ही राज्ये मानवी व्यापारात आघाडीवर असल्याचे लक्षात येते. दक्षिण भारत देशाचा प्रगत हिस्सा कसा मानायचा असा प्रश्न उभा राहतो. या पाच प्रांतांत देशातील एकूण वेश्या

    सामाजिक विकासवेध/१४३