पान:साथ (Sath).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 बराच उशीर झाला होता तरी तिनं फिरायला जायचं ठरवलं. दुपारभर हिशेब तपासत बसल्यामुळे तिचं डोकं भणभणत होतं, आणि भराभर चालून त्याचा शीण घालवावासा वाटत होता. खरं म्हणजे हा विनोदच होता, पण त्यांचे चीफ अकाउंटंट मंत्री एवढंसं तोंड करून आले तेव्हा माझा त्रिवेणी सीड्सशी आता काही संबंध नाही असं त्यांना निक्षून सांगणं काही तिच्याच्यानं झालं नाही. रामला हिशेब, बॅलन्स शीट वगैरे दाखवायच्या आधी तिनं ते नजरेखालन घालावे अशी त्यांची इच्छा होती. ती साहजिक होती, कारण ज्योतीला थोड्या चुका सापडल्याच. किरकोळ होत्या, पण अनुभवी हिशेबनिसाकडून राहून जायला नको होत्या. त्यांनी हिशेब होते तसेच रामसमोर ठेवले असते तर रामने त्यांना चावून खाल्लं असतं. स्टाफचे लोक त्याला भयंकर वचकून असायचे आणि ते तसे असावेत अशीच त्याची अपेक्षा होती. तेव्हा तो रागावण्याची भीती असली की ते ज्योतीला मधे घालून

९०: साथ