पान:साथ (Sath).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 हे होटेल काही आपल्याला मानवत नाही असं ज्योतीने अनिच्छेनेच स्वतःशी कबूल केलं. हे अगदी नव्या बांधणीचं होतं. लहानात लहान खोल्या, त्यात कुठेतरी एकदम ऑर्डर देऊन करवून घेतलेलं स्वस्तातलं फर्निचर, भडक रंगाचे पडदे आणि पलंगपोस, भिंतीवर चकाकणारा इनॅमल रंग, टेबलांवर लावलेलं फॉर्मायका हे सगळं तिला खुपत होतं. पण सगळयात तिला उबग आला होता तो म्हणजे स्वच्छतेबद्दल तिथे फारसा उत्साह नव्हता त्याचा. तसं जेवणखोलीतला टॉवेल सोडला तर बाकी काहीच अगदी अस्वच्छ होतं असं नाही, पण अगदी प्रसन्न वाटेल इतकं स्वच्छही नव्हतं.
 तिला वाटलं, श्रीमंती सवयी काही फक्त रामलाच लागतात असं नाही ब्ल्यू व्हॅली होटेलातल्या प्रशस्त आरामशीर खोल्या, सुरेख जुनं फर्निचर, कुशल स्वैपाक्यांनी बनवलेलं उत्तम जेवण, हवं नको विचारण्याची नोकरवर्गाची तत्परता ह्या सगळ्याची

[६]

साथ : ८१