पान:साथ (Sath).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

" तुम्ही त्यांच्याविरुद्ध कसं जाऊ शकाल ? तुम्ही त्यांच्यातलेच एक. तेव्हा तुम्ही त्यांच्याइतकेच लोभी आणि बेइमान असायला पाहिजे. बरं, मला एवढंच सांगा, त्यांचं बी तिकडे वळवण्यासाठी जिल्हा परिषद तुम्हाला किती देतेय?"
 यशवंतरावांचा चेहरा धक्का बसल्यासारखा झाला. “साहेब, असं कसं तुम्ही म्हणता ? मी असं करीन असं तुम्हाला वाटलं तरी कसं?" मग समजूतदार आवाजात ते म्हणाले," हे बघा साहेब, तुम्ही अगदी थोडा जरी दर वाढवून दिला ना, म्हणजे वीस किंवा पंचवीस पैसे, जास्त नाही, तरी मी लोकांची समजूत घालू शकेन.'
 " मी सौदेबाजी करणार नाही, यशवंतराव." रामचा आवाज चाबकाच्या फटकाऱ्यासारखा आला."मला जे म्हणायचं होतं ते सगळं तुम्हाला सांगितलंय, आता चर्चा करण्यासारखं काही उरल नाहीये. तुम्ही जाऊ शकता. आणि तुमच्या शेतकऱ्यांना सांगा की मी हे गप्प बसून ऐकून घेणार नाही. प्रत्येकाला कोर्टात खेचीन. तुम्ही धरून.”
 " ऐकून तर घ्या साहेब."
 " मी कामात आहे. मला बसून तुमच्याशी गप्पा मारायला वेळ नाहीये."
 शेवटी रामशी आणखी बोलण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही हे यशवंतरावांना कळून चुकलं आणि ते निघून गेले. रामने कांबळेला सांगितलं की असाच्या असा परत बिरवाडीला जा, आणि मळणीचं काम थांबवून आपला थ्रेशर परत घेऊन ये.
 ज्योती म्हणाली, "मला वाटतं त्यांना भाव थोडासा वाढवून द्यायला हवा होतास."
 " त्यांची ब्लॅकमेल मुकाट्यानं ऐकून घ्यायची ?"
 " त्यांच्या भल्यासाठी नाही, आपल्या धंद्याच्या दृष्टीनं ते बर झालं असतं."
 " त्यांनी बहुतेक ऐकलंच नसतं. ज्याला लोभच सुटलाय तो कमी पैसे घ्यायला का म्हणून तयार होईल ? ते कराराशी इमान

६८ साथ