जरूर असतं, ते ठेवणं कठीण जायला लागलं. एखाद्याचं पीक त्या अंतराच्या आत असेल तर ते फुलावर येण्याआधीच उपटून टाकण्यासाठी त्या माणसाला अवाच्या सवा नुकसानभरपाई द्यावी लागे. तरीही तो राजी झाला नाही तर मग सीड प्लॉटवर पाणी सोडावं लागे.
ह्या सगळ्या अडचणींवर मात करायला रामने एक शक्कल काढली. एका सबंध गावालाच बीजोत्पादक बनवायचं. म्हणजे इतर पिकांच्या लुडबुडीचा प्रश्न नाही. आणि एकाच ठिकाणी बऱ्याच क्षेत्रावर बियाणाचं उत्पादन केलं म्हणजे तिथे एक सुपरवायझर कायमच ठेवून देणं परवडेल. तो तिथेच असला म्हणजे पिकाची देखभाल उत्तम होऊ शकेल. उत्पन्नही वाढेल. शिवाय बियाणाच्या जास्तीत जास्त शुद्धतेची हमी मिळेल. कंपनीतर्फे फाउंडेशनचे बियाणे, खते, कीटकनाशके वगैरे पुरवून मग खरेदी केलेल्या बियाणाच्या किमतीतून त्यांचे पैसे वळते करून घ्यायचे, म्हणजे शेतकऱ्याने नको तिथे काटकसर करून उत्पन्नात मार खाल्ला असं व्हायला नको.
योजना छान होती, आणि शिरगावपासून पन्नासेक किलोमीटरवर बिरवाडी म्हणून एका गावातले दीडशे शेतकरी सहाशे एकर क्षेत्रावर बियाणाचे प्लॉट घ्यायला तयार झाले. दोन वर्षं सगळ सुरळीत चाललं नि मग एकदम एक दिवस योजना कोलमडला. कुणाचा तरी लोभ हे अपेक्षितच कारण. बातमी आणली रामन बिरवाडीला सुपरवायझर म्हणून नेमलेल्या कांबळेनं.
तो रामच्या ऑफिसात आला तशी तो का आला ह्याचा चौकशीही न करता राम खेकसला, "तू आता इथे का ? मळणी संपून सगळं बी पोत्यांत सीलबंद झाल्याशिवाय तिथून हलू नको म्हणून सांगितलं होतं की नाही तुला?"
कांबळेला आधीच रामची जबरदस्त भीती वाटायची. आता तर त्याची बोबडीच वळली. कसंबसं तत - पप करीत तो म्हणाला, " शेतकरी त्यांचं बी जिल्हा परिषदेला विकतायत.
" त्यांचं बी नाही, माझं बी."
पान:साथ (Sath).pdf/72
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६४: साथ