पान:साथ (Sath).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 धंद्याचा व्याप वाढला त्यात आपल्याला नेमकं काय खुपतंय असा तिने बरेचदा विचार केला होता. धंद्याच्या वाढलेल्या आकारमानामुळे आपलं स्थान त्यात नगण्य राहतं हे खुपत होतं ? तिचं स्थान मुळीच नगण्य नाही, फार महत्त्वाचं आहे असं रामने तिला कितीदा तरी बोलून दाखवलं होतं. तिला सुद्धा ते पटत नव्हतं असं नाही, तरी पण धंद्याच्या सर्व निरनिराळ्या अंगांशी आपला पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष संबंध येत नाही हे तिला डाचत राहिलं.
 राम एकदा हसत तिला म्हणाला होता, " तुझ्या त्या डझनभर बाया हातानं बी निवडतायत अन् तू त्यांच्यावर मुकादमी करत्ययस असंच तुला सगळ्यात आवडेल ना?"
 एकदा जरा गंभीरपणे धंद्याची सारखी वाढ होत का राहिला पाहिजे हे त्याने तिला समजावून सांगितलं होतं. कामगारांचे पगार वाढवीत न्यावे लागतात, त्यांना पगाराव्यतिरिक्त इतर सवलती, बोनस द्यावे लागतात. त्याकरता कंपनीचा नफा वाढता असावा

६२ : साथ