हे पान प्रमाणित केलेले आहे.
५
ज्योती दचकून जागी झाली. तिला वाटलं की हा कर्णकर्कश गोंगाट आपल्या खोलीतच चालला असला पाहिजे. थोड्या वेळाने तिला जाणवलं की आवाज गावातनच येत होता. लग्नबिग्न असणार. आपण काहीतरी साजरं करतोयत हे पहाटेपासून लाउडस्पीकर लावून जगाला ओरडून कशाला सांगावं लागतं हे तिला कधीच कळलं नव्हतं. बहुसंख्य लोकांसारखंच तक्रार न करता ती हा आवाज सहन करायची. तिनं मनात खूणगाठ बांधलेली होती की असं शांततेवर आक्रमण फक्त अडाणी, गावंढळ, असंस्कृत लोकच करतात. आणि मग रामने अप्रत्यक्षपणे का होईना, तिला अशांच्या पंक्तीत नेऊन बसवलं.
त्या पहाटे ती जागी झाली ती बिसमिल्लाखानच्या सनईचे सूर ऐकून. त्यांच्या बियाणाच्या प्रॉसेसिंग प्लॅंटचं उद्घाटन होतं त्या दिवशी. आणि जागी झाल्यावर ज्योतीनं मनातल्या मनात कुरकूर केली ती केवळ तिच्या कानावर झालेल्या तीव्र आघाता-
साथ : ५१