पान:साथ (Sath).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यानं तिला पहिल्यापासून सांगितलं होतं, " तुला किती हवे तितके नोकर ठेव, पण तुला घरकामात वेळ घालवायला लागता कामा नये. जास्त महत्त्वाचं काम करायला तू समर्थ असताना झाडलोट, भांडीधुणी, स्वैपाक ह्यात तुझा वेळ आणि शक्ती का खर्च होऊ द्यायची ?" आधी तिला घरकामाची हौस नव्हतीच. तेव्हा रामने असं सांगितल्यावर तिला फारच आनंद झाला. पण मिळालेलं स्वातंत्र्य अगदी काही झालं तरी घरकामाला हातच लावायचा नाही इतकं टोकाला नेलं की त्याचंसुद्धा बंधन होऊ शकतं.
 तिला एकदम विनीनं फ्लॅटबद्दल काय सांगितलं ते आठवलं. " तू फ्लॅट विकायला काढलायस?
 " हो."
 " का ?" याहून चांगला किंवा जास्त अलिशान वस्तीतला फ्लॅट घेण्यासाठीच असणार असंच तिला वाटलं.
 " आपण शिरगावला परत जाऊ. तेच तुला हवंय ना?"
 " काय ?" तिला बसलेला धक्का इतका जोरदार होता की क्षणभर तिचं डोकं चालेनासं झालं. मग तिच्या मनात आलं, देवा, हे मी काहीतरी चुकीचं ऐकलेलं असू दे. त्याच्याकडून एवढा त्याग मी स्वीकारू शकत नाही. आणि आता फार उशीर झालाय. परत जाण्यानं काय फरक पडणार आहे ?
 ती भानावर आली तेव्हा तो म्हणत होता, "ज्यो, तू माझ्याकडे परत आलीयस ना?"
 " पण राम, मला कळत नाहीये काही. शिरगावला परत जायचं?"
 " हेच सगळं तुला आवडत नाही ना? असं राहणं ? मग ते आपण सोडून देऊ."
 " असं एकदम सोडून द्यायचं ?"
 " काय हरकत आहे त्याला?"
 " तूच नेहमी म्हणतोस ना की घड्याळाचे काटे उलटे फिरत नाहीत, आपण नेहमी पुढेच पाऊल टाकलं पाहिजे, मागे वळून

१७६ : साथ