बंधनं जो मानतो त्यालाच जाचतात. एकदा ज्योतीची एक मैत्रीण म्हणाली होती, “ मुलं असली म्हणजे अगदी बांधल्यासारखं होतं नाही?" ज्योती म्हणाली होती, " नाही बाई." तेव्हा ती मैत्रीण पटकन म्हणाली होती, " हो बरोबर ! तू काही आमच्यातली नाहीस. तुझं सगळं वेगळंच आहे." तिच्या आवाजातलं थोडा हेवा, थोडी कीव, थोडा टीकात्मक सूर ह्यांचं मिश्रण ऐकून ज्योतीला गंमत वाटली होती. कुठल्याही गोष्टीनं आपल्याला बांधून ठेवण्यासाठी आधी आपण बांधून घ्यायला राजी असलं पाहिजे. प्रत्येकाला एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. ज्योतीनं आपल्या मुलांना आपल्या कामात व्यत्यय आणू दिला नव्हता. आज तिला थोडंसं असं वाटत होतं की हा निर्णय सर्वस्वी आपला नव्हता. तरी पण रामनं त्याचा निर्णय तिच्यावर लादला होता असंही तिला म्हणता येईना. पहिल्यापासून त्यानं पुढे जायचं नि तिनं त्यानं आखलेल्या वाटेनं मुकाट्यानं चालायचं
साथ : १६५