पान:साथ (Sath).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निसटलंय असं का वाटतंय ?"
 " असं कसं म्हणतेस तू? तुला काय नाहीये? तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा, दोन छान मुलं, तुझं काम-
 " माझं काम नाही, रामचं काम."
 " पण ते तुझं समजून आयुष्यभर केलंस ना तू ?"
 " हो, पण आवडीचं म्हणून मुद्दाम काही मी हे कार्यक्षेत्र निवडलं नाही. एका योगायोगानं ते माझ्यावर लादलं गेलं. राम कोष्टी असता तर मी माग चालवायला शिकले असते."
 " हा सगळा विचार फार पूर्वीच करायला हवा होतास. आता जरा उशीरच झाला असं वाटत नाही का तुला?"
 " उशीर झालाय, पण वेळ पार निघून गेली नाही. म्हणूनच मला तरुणपणी फारशी अक्कल नसताना केलेली चूक आता दुरुस्त करायचीय. "
 " रामला काय वाटेल याचा तू विचार केलायस? तू म्हणजे त्याचं सर्वस्व आहेस."
 " वाईट वाटेल, पण तो ते सहन करू शकेल. माझ्याखेरीज त्याच्या आयुष्यात इतर पुष्कळ गोष्टी आहेत."
 " आणि तुझं काय? तू खरंच एक नवं आयुष्य उभारू शकशील असं तुला वाटतं ?"
 " का नाही ? माझ्याआधी इतरांनी उभारलेलं आहे."
 " ज्यो, तू रामशी बोललीस का? आत्ता मला जे सांगितलंस ते त्याला सांगितलंस? मला वाटतंय तू मनातल्या मनात कुढत बसून राईचा पर्वत केलायस. तुम्ही दोघांनी बसून एकमेकांशी बोललात तर त्याचं वागणं तुला कुठे खुपतंय ते त्याला कळेल तरी. तो अतुलसारखा नाहीये. त्याला तुझ्याबद्दल नुसतं प्रेमच वाटतं असं नाही तर आदरही वाटतो. तो तुझं बोलणं नीट ऐकून घेईल, त्याच्यावर विचार करील."
 " तो ऐकून घेईल, पण समजून घेणार नाही. समजून घ्यायचा प्रयत्नच करणार नाही. तुला खरंच वाटतं का, की मी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केलाच नाही? तू म्हणतेस त्याचं

१६२ : साथ