हे पान प्रमाणित केलेले आहे.
मनुष्यजातीला त्याची शिक्षा देतोयस?".
" बरोबर आहे तुझं. ज्यो, तू माझ्याबरोबर आहेस तोवर मी इतर कुणाचीही कदर का करावी ? तू कधी माझ्या विश्वासाला तडा जाईल असं काही करणार नाहीस ना?"
" अर्थातच नाही."
" वचन दे मला."
" मी वचन देते की मी कधीही तुझा विश्वासघात करणार नाही."
ज्योती अंधारात स्वतःशीच हसली. आपण असली विधानं किती सहजपणे करतो ! रामला काय वाटत असेल आत्ता ? मी खरंच त्याला सोडून गेले तर तो ते कसं सहन करील? मग तिनं स्वतःला फटकारलं. मूर्खपणा करू नको. राम पुरेसा खंबीर आहे. त्याने आतापर्यंत अनेक वादळांना तोंड दिलं, यालाही देईल. आणि माझ्यावर कुणीतरी इतकं अवलंबून आहे, माझ्यावाचून कुणाचं अगदी अडेल अशी मी स्वतःची गोड समजूत का करून घ्यावी?
□
साथ:१३९