Jump to content

पान:साथ (Sath).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२



 होटेलच्या व्हरांड्यावरच्या आरामखुर्चीवर ज्योती पहुडली होती. डोळे मिटलेले, शरीर सैलावलेलं, पुस्तक चार ओळी वाचून पोटावर उपडं ठेवलेलं. तिला स्वत:चंच नवल वाटत होतं. कसल्या जबाबदाऱ्या नाहीत, कसले ताणतणाव नाहीत अशी सुट्टी आतापर्यंत कधी अनुभवल्याचं तिला आठवत नव्हतं. आणि ह्या मुक्ततेचा ती पुरेपूर आस्वाद घेत होती.
 तिच्या मनात आलं, सगळं दोघांनी मिळून करणं चूक आहे का? असा प्रश्न तिनं कधी स्वत:ला विचारला नव्हता, पण तरी तिच्या मनात खोल कुठेतरी असा विचार होता की एवढं सगळं काम मी स्वतंत्रपणे केलं असतं तर मला त्याचं स्वतंत्र श्रेय मिळालं असतं. आता जरी राम तिला श्रेय देत असे, अगदी सढळपणे देत असे, इतरांसमोर मुद्दाम तिच्या सहकार्याचा उल्लेख करीत असे, तरी ते तेवढ्यापुरतंच रहायचं. जगाची रीत वेगळी असल्यामुळे रामखेरीज दुसरं कुणी हा उल्लेख फारसा मनावर

साथ १२७