पान:साथ (Sath).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर किती बरं झालं असतं. मी ह्या अडचणीच्या जागी येऊन पोचलेय कारण मी अमुक वेळी अमुक केलं. किंवा केलं नाही. किवा त्यानं केलं किंवा केलं नाही. पण आयुष्य म्हणजे काही प्रसंगांची तार्किक मांडणी नसते. किंवा असेलही, पण त्यातलं सूत्र फार उशीर होईपर्यंत आपल्याला कळतच नाही. आणि वेळेवर कळलं तरी त्याचा उपयोग काय म्हणा? कारण त्यात काही बदल करणं आपल्याला शक्य नसतंच. सगळ्या दोऱ्या काही आपल्या हातात नसतात.

साथ: ११७