राहायचा चान्स दिल्याबद्दल."
हे नेहमीचंच. जरा त्याच्याशी सूर जुळतोय असं वाटलं की तो विसंवादी सूर काढणारच. ती रागातच त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिली. हात खिशात, पोक काढून चालणं, रामसारखे दाट काळे केस, पण भरभरीत, विस्कटलेले, कोंडा झालेले. ज्योतीच्या मनात आलं, या मुलांना असं गबाळ रहायला खरंच आवडतं का? की आईबापांना डिवचण्यासाठी केलेल्या गोष्टी कायमच्या सवयी बनून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतात?
आणि खरं म्हणजे तो जाता जाता जे उद्गार तिच्या तोंडावर फेकून गेला ते काढायला पुरेसं कारण होतं. महाबळेश्वरला जायचं म्हणजे मुलांना घेऊन ती क्वचितच जात.
राम म्हणायचा, “आपण कामातून अंग काढून विश्रांती घ्यायला जातो. मुलं बरोबर असली की कुठे विश्रांती मिळते ?"
" पण राम, मुलं आपल्याबरोबर किती थोडा वेळ असतात. मग ती सुट्टीसाठी घरी आली असताना त्यांना एकटं टाकून आपण कशाला जायचं ?"
" मुलांना घेऊन जायचं तर जाण्यातच अर्थ नाही. ती भांडतात, रडतात, कंटाळा आला म्हणून तक्रारी करतात, त्यांना होटेलातलं जेवण आवडत नाही. मग आपला सगळा वेळ त्यांना इकडे - तिकडे घेऊन जा, त्यांच्यासाठी खरेद्या कर ह्यातच निघून जातो. म्हणजे तुला तर खरी विश्रांती मिळण्याची सुतराम शक्यता नाही. शिवाय आपण दोघांनीच एकमेकांबरोबर कधी वेळ घालवायचा ? तीनचार दिवसांचा तर प्रश्न आहे. मग आहोतच की आपण घरी."
आहोत म्हणजे दिवसभर घराबाहेर राहून काम करायला, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला नाही. पण ती त्याच्याशी फारसा वाद न घालता त्याचा हट्ट चालवून घ्यायची, आणि मग महाबळेश्वरमधला सगळा वेळ तिला अपराधी वाटत रहायचं.
बाळंतपणानंतर प्रतापला घेऊन घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी रामनं तिला विचारलं होतं, “ कामाला कधी सुरुवात
साथ: ११३