पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 " सांगली भूषण" सन्मानाचे मानकरी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी 'विश्व जागृती मंडळ' ही एक सांगलीमधील नामवंत संस्था आहे. सांगली शहराचे नाव आपल्या कर्तृत्वाने अन्नत करणाऱ्या व्यक्तीस 'सांगली भूषण' अशा पुरस्काराने सन्मानित करण्याचा अपक्रम या संस्थेने १९९६ पासून सुरु केला. दहा हजार रुपये रोख, गौरव चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असते. आजपर्यंत चार व्यक्तिना अशा प्रकारे सन्मानित करण्यात आले. ते मानकरी खालीलप्रमाणे : १) डॉ. भय्यासाहेब परांजपे नेत्र विशारद ୨୧୧& २) खासदार श्री. आण्णासाहेब गोटखिंडे ୨୧୧୨ ३) स्वर्गीय श्रीमती राजमतीअक्का पाटील ୨୧୧୪ ४) श्रीमती आशा भोसले ୨୧୧୧ ५) श्री. संभाजीराव भिडे याना इ.स. २००० साठी हा पुरस्कार घोषित झाला आहे. सांगली आणि सांगलीकर.. .२७०