पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९३५ सांगलीस वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने ज्युबिली इलेक्ट्रिक वर्क्सची स्थापना. दोनच वर्षात श्रीगणपतीमंदिरास पहिले कनेक्शन देऊन वीजनिर्मितीस प्रारंभ. १९३७ सांगलीत “दक्षिण महाराष्ट्र" आणि "विजय" ही साप्ताहिके निघू लागली. १९३८ सांगलीत दक्षिण संस्थान प्रजापरिषद सांगलीत भरली. वल्लभभाई पटेल, कमलादेवी चटोपाध्याय, पट्टाभीसीतारामय्या असे मोठे नेते अपस्थित होते. १९३९ सांगली नगरपालिकेत लोकनियुक्त अध्यक्ष निवडण्याबाबतची घटना मंजूर. १४ ऑगस्ट रोजी सांगलीच्या जुन्या स्टेशन चौकात क्रांतिकारकांविरुद्ध गोळीबार झाला. श्रीमती अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन सांगलीत आश्रयासाठी आले. १९४२ १९४३ १९४७ १९४७ १९४८ १९४८ २४ जुलै १९४३ रोजी सांगली तुरुंगातून वसंतदादा पाटील यांचे पलायन. खांद्याला गोळी लागून जखमी. त्यांचे सहकारी अण्णा पत्रावळे, बाबुराव जाधव यांचे निधन. सांगलीत नाट्यशताब्दी महोत्सवासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आगमन. सांगलीचा पहिला मास्टर प्लॅन तयार झाला. याच वर्षी वालचंद इंजिनिअरींग कॉलेजची स्थापना. १५ ऑगस्टला - स्वातंत्र्यदिन साजरा. १ फेब्रुवारीस गांधीहत्येनंतर सांगलीत प्रचंड जाळपोळ. ८ मार्च रोजी सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. त्यापूर्वी राजेसाहेबानी रु. ३५ लाखाचा ट्रस्ट करुन तो सांगली नगरपालिकेच्या स्वाधीन केला. सांगली ही दक्षिण सातारा जिल्ह्याची राजधानी झाली. १९५० सांगलीला मार्केट अॅक्ट लागू झाला. १९५६ सांगलीच्या शेतकरी सहकारी कारखान्याची स्थापना झाली. १९६० सांगलीच्या राजेसाहेबांचा ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार. चिंतामणराव पटवर्धन कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना. २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे पूर्वीचे दक्षिण सातारा हे नाव बदलून सांगली जिल्हा असे नामकरण झाले. १९६१ कृष्णा नदीस महापूर. १९६२ जिल्हा लोकल बोर्डाच्या जागी जिल्हा परिषदेची स्थापना. सांगली आणि सांगलीकर.. २६८