पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाले. त्यांच्या अज्ञानकाळात सांगलीचे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून अच्युत भास्कर देसाई यांची नेमणूक झाली. १९०४ सांगली संस्थानात लोकल बोर्ड स्कूल बोर्डाची स्थापना. याच वर्षी सांगली पांजरपोळ संस्थेची स्थापना. - कै. विष्णु रामचंद्र राजवाडे यांनी सांगलीत पहिला खाजगी छापखाना सुरु केला. १९०५ सांगलीत हळद वायदेबाजाराची स्थापना. कॅप्टन बर्क अॅडमिनिस्ट्रेटर झाले. १९०७ सांगली-मिरज रेल्वे फाटा सुरू झाला. १९०५। कॅप्टन बर्क यांच्या कारकीर्दीत सांगली संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत १९१० व सक्तीचे. १९०८ मध्ये वखारभागाची स्थापना होऊन व्यापारास अत्तेजन मिळाले. कृष्णा नदीचे पाणी टाकीत साठवून नळाने घरोघरी पुरवठा सुरु झाला. शाळा, कचेऱ्या, कोर्टे यासाठी सुंदर अिमारती बांधल्या गेल्या. वॉटर वर्क्सची स्थापना. १९१३ १९१४ सांगलीत कृष्णा नदीस महापूर आला. ४,५,६ ऑगस्ट असे ३ दिवस शहरात पाणी होते. याच वर्षीच्या ४ डिसेंबरला सांगलीत पहिली खाजगी माध्यमिक शाळा सुरू झाली. (सिटी हायस्कूल) १९१६ राजेसाहेबांच्या पुढाकाराने ५ आक्टोबर रोजी सांगली बँकेची स्थापना. २२ जून रोजी विलिंग्डन कॉलेजची स्थापना झाली. १९१९ १९२० १९२१ २० फेब्रुवारी रोजी ज्योतिष संमेलनाच्या निमित्ताने लो. टिळकांची सांगलीला भेट. याच वर्षी १२ नोव्हेंबरला सांगलीला म. गांधींची भेट. याच वर्षी शिवाजीनगर आणि टिंबर एरिया वसाहतीस प्रारंभ जैन महिलाश्रमाची स्थापना. १९२२ दक्षिण संस्थानी प्रजा परिषद चळवळीचे सांगलीत अधिवेशन. १९२८ सांगली नगरपालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यास प्रारंभ. १९२९ आयर्विन ब्रिज बांधला. १८ नोव्हेंबर रोजी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते उद्घाटन. १९३० १९३३ सांगलीत मेडिकल असोसिएशनची स्थापना. सांगलीत राणीसाहेबांच्या (सरस्वतीदेवी पटवर्धन) पुढाकाराने महिला परिषदेची स्थापना. याच वर्षी महिला शिक्षण मंडळामार्फत मुलींच्या स्वतंत्र हायस्कूलची सुरुवात. - डॉ. आंबेडकर, भाई परमानंद आणि डॉ. मुंजे यांच्या सांगली भेटी. सांगली आणि सांगलीकर... . २६७