पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४३ श्रीमंत आप्पासाहेबांच्या प्रोत्साहनामुळे विष्णुदास भावे यानी मराठी रंगभूमीवर 'सीतास्वयंवर' हे पाहिले नाटक सादर केले. १८४४ श्रीगणपतीमंदिराचे ३० वर्षे चाललेले बांधकाम पूर्ण होऊन 'अर्चा' समारंभ थाटामाटात साजरा झाला. १८५० १८४६ थोरल्या चिंतामणरावाना बागांची खूप आवड होती. आंबराई, मिरज मळा, गणपतीमळा, तात्यासाहेब मळा, असे २५ मळे त्यानी तयार करवून घेतले. थोरले चिंतामणराव आप्पासाहेब यांचे निधन झाले - त्याच वर्षात मुन्सफ न्यायालये प्रथम स्थापन झाली - श्रीमंत धुंडीराम तात्यासाहेब सांगली संस्थानचे दुसरे अधिपती झाले. १८५१ १८५३ १८५५ १८६१ १८६३ १८६५ १८६९ कृष्णा नदीला महापूर आला. त्यामुळे खणभाग वसाहतीला चालना मिळाली. सांगलीत पहिला सरकारी दवाखाना निघाला. सांगलीत सार्वजनिक शिक्षणास सुरवात झाली. मराठी शाळांची सुरवात. सांगलीत पहिली इंग्रजी शाळा स्थापन झाली. त्याच वर्षी वेदशास्त्र शाळेची स्थापना झाली. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, न्याय, व्याकरण आणि ज्योतिष शिकवणाऱ्या ५ पाठशाळा सुरू झाल्या. सांगली नगरवाचनालयाची स्थापना. १८७२ सांगली शहराचा पहिला सिटी सर्व्हे झाला. १८७६ सांगली म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. १९८८४ गणेशदुर्गात दगडी कमान बांधण्यात आली. १८८७ सांगली शहराला काकडवाडीहून सायफन पद्धतीने पाणी-पुरवठा सुरू झाला. १८८९ सांगली म्युनिसिपालिटीमध्ये पहिला आगीचा बंब आला. १८९१ सांगलीत पोस्ट ऑफिस सुरु झाले. १८९३ सांगली स्टेट बँक सुरू झाली. १८९८ सांगलीत पहिली प्लेगची साथ आली. एकूण लोकवस्तीच्या मानाने मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. एकूण २ हजार १५९ माणसे मृत्युमुखी पडली. १९०१ सांगलीचे दुसरे अधिपती श्रीमंत धुंडिराव तात्यासाहेब निधन पावले. १९०३ दत्तकविधीनंतर पटवर्धन घराण्यातील चि. भाऊसाहेब पटवर्धन हे श्रीमंत दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब म्हणून सांगली संस्थानचे तिसरे अधिपती सांगली आणि सांगलीकर.. .२६६