पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर्वजण अत्सुक आहेत. अद्यानाला ज्यांचे नाव दिले आहे त्या सांगली संस्थानच्या युवराजांचा - प्रतापसिंहाचा छोटेखानी पुतळा अद्यानात आहे. सर्वसाधारणपणे सांगलीतील प्रेक्षणीय स्थळे म्हणावीत अशी एवढीच. ज्याला रूची आहे त्याने विलिंग्डन कॉलेज, वालचंद अिंजिनिअरींग कॉलेज अशी शैक्षणिक मंदिरे पहावीत. त्याशिवाय आधुनिक काळातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून सांगलीचा वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना अवश्य पहावा. असाचा रस काढण्यापासून, तो शुभ्र साखर तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया ही पाहण्यासारखीच आहे. वसंतदादांच्या अथक प्रयत्नांनी अभा राहिलेला हा कारखाना, आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना आहे. सांगलीत येणाऱ्या पाहुण्याला वर अल्लेखलेली प्रेक्षणीय स्थळे तर दाखवावीच; खेरीज हरीपूर-सांगलीवाडी परिसरातील हळदीची पेवे अवश्य दाखवावीत. सांगलीच्या परिसरातील मंदिरे, औदुंबर, नरसोबावाडी ही दत्तस्थाने पहाण्यासारखी आहेत. निसर्गप्रेमींसाठी सागरेश्वर, चांदोलीसारखी अभयारण्ये, दंडोबा, शुकाचार्याचा डोंगर आणि डोंगरावरील मंदिरे, गुढेपांचगणीसारखी निसर्गरम्य ठिकाणे ही मोठीच आकर्षणाची ठिकाणे आहेत. खिद्रापूरची लेणी प्रेक्षणीय आहेत. मिरजेतील मंदिरे, समर्थ शिष्या वेणाबाईंचा मठ, हजरत मिरासाहेब दर्गा, करगणीचे राम मंदिर, तासगावचे गणेशमंदिर, खरसुंडीचे रेवणसिद्ध मंदिर, बहे गावी रामदास स्वामीनी अभारलेले हनुमान मंदिर, अशी सांगलीच्या आसपासची ठिकाणे मुद्दाम भेट द्यावीत अशी आहेत. बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीच्या अत्सवासाठी, आणि जिवंत नाग पकडण्यामधील थरार अनुभवण्यासाठी दूरदूरचे पर्यटक आवर्जून सांगलीत येतात. पुढील काळात कुणा कल्पक प्रवासी संस्थेने 'सांगली दर्शन' अशी नैमित्तिक सहल सुरू केली तर आश्चर्य वाटायला नको अितकी गुणवत्ता सांगली परिसरात निश्चितच आहे. सांगली आणि सांगलीकर... . २६४