पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुल्क फक्त एक रुपया. अिथल्या कर्मचाऱ्यानी या संग्रहालयाची देखभाल अत्तम ठेवली आहे हे आवर्जुन सांगायला हवं. ७. आमराई : सांगलीचे पहिले अधिपती थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन याना मळा आणि बागा करण्याचा नाद होता. काळाच्या ओघात सर्व बागा नष्ट झाल्या. मात्र १८४६ मध्ये तयार झालेले संस्थानी काळातील आमराई अद्यान आजही दिमाखात उभे आहे. हे मोठे देखणे अद्यान आहे. सांगली हायस्कूलच्या शेजारी असलेल्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या अद्यानात, अनेक तऱ्हेची वृक्षवल्ली आहेत, नाही फक्त आंब्याचे झाड ! १९८५ मध्ये येथील झाडांची मोजदाद करण्यात आली होती. तेंव्हा सव्वाशे जातींचे वृक्ष आमराईत असल्याचे नमूद झाले होते. त्यामध्ये चिंच, गोरखचिंच, चंदन, मोहोगनी, टेंभुर्णी, बेलगामवट, केशिया, रिठा, चेंडूफूल, भद्रलता, राचण, खडशिरणी, अशोक अशा अनेक जातींच्या वृक्षांचा समावेश आढळला. यापैकी बेलगामवट हा मूळचा आग्नेय आशियातील वृक्ष आहे. चेंडूफूल दक्षिण अमेरिकेतील आहे. पूर्वी आमराईत चंदनाची विपुल झाडे होती. पण नंतर या मौल्यवान वृक्षांची चोरी झाली. गेल्या कांही वर्षात आमराईची खूपच हेळसांड झाली होती. मात्र अलीकडे जागरूक निसर्गप्रेमी लोकांमुळे मूळच्या दुर्मिळ वृक्षांची रोपे लावणे, नवीन जातींची लागवड करणे अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष गेले आहे ही एक समाधानाची गोष्ट आहे. दक्षिण महाराष्ट्रातील एक 'बोटॅनिकल गार्डन' म्हणून आमराई अद्यान विकसित करावे इतकी गुणवत्ता या अद्यानात आहे असे अनेक जाणकारांचे मत आहे. घनदाट झाडीमुळे येथे नीख शांतता असते. सकाळच्या प्रहरी बरेच लोक फेरफटका करण्यासाठी येतात. असंख्य पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकून अत्साहाने कामाला लागतात. आमराईत एक छोटेसे मारूती मंदिर आहे. ८. प्रतापसिंह अद्यान : सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी हे अद्यान आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी घसरगुंडी, झोपाळे आदी खेळ खेळण्यासाठी मुलांची अद्यानात खूप गर्दी असते. त्याबरोबरच बाहेर अभ्या असलेल्या भेळवाल्यांच्या, आईस्क्रिमच्या गाड्या यामुळे गर्दीमध्ये भरच पडत असते. मात्र या अद्यानाचे मुख्य आकर्षण आहे ते प्राणीसंग्रहालयाचे. त्यामध्ये वाघ, अस्वल, कोल्हे, ससे, हरणे, मगरी, चित्ते, सर्प, माकडे, रंगीबेरंगी पक्षी, मोर आहेत, पण मुलांची गर्दी असते ती सिंहाच्या पिंजऱ्याभोवती. एकेकाळी ३०-३५ सिंह असलेल्या या अद्यानातील अपुऱ्या जागेमुळे आणि गैरव्यवस्थेमुळे एकामागोमाग होणारे सिंहांचे मृत्यू पाहून मुक्या प्राण्यांचे प्रेम असणाऱ्या सहृदय प्रेक्षकांना फार मनःस्ताप होतो ! सर्व सिंहाचे नीट पुनर्वसन झालेले पाहण्यास सांगली आणि सांगलीकर... .२६३