पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याना आलेल्या भेटवस्तू, मुद्दाम जतन केलेल्या दुर्मिळ वस्तू यांच्या आधारे हे संग्रहालय अभे केले गेले. तसे सालारजंग म्युझिअम वा म्हैसूर, बडोद्याच्या तुलनेत हे म्युझिअम खूपच छोटं असले तरी वैशिष्टयपूर्ण आहे. या संग्रहालयाचं प्रमुख वैशिष्टय म्हणजे जगप्रसिद्ध चित्रकारांची तैलचित्रे. प्रख्यात युरोपिअन चित्रकार जेम्स वेल्स आणि एम. मुल्लर यांच्याबरोबर आबालाल रेहमान, रावबहाद्दूर धुरंधर यांच्या काही अप्रतिम कलाकृती येथे आहेत. त्यातील नाना फडणीस व सवाई माधवराव यांची तैलचित्रे, त्याना प्रत्यक्ष समोर बसवून जेम्स वेल्स यांनी काढलेली आहेत. रावण-जटायू युद्ध, गंगावतरण, राजकन्येचे ब्राम्हणास दान....अशी काही तैलचित्रे अत्यंत मनमोहक आहेत. दीड-दोनशे वर्षापूर्वीची ही चित्रे आजहि ताजीतवानी वाटतात, ती त्यातील अत्तम प्रतीच्या रंगयोजनेमुळे. संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशीच १७९१ मधील एक युद्धप्रसंग दाखवणारं भव्य चित्र आहे. लॉर्ड कॉर्नवालिसच्या फौजेत पटवर्धन सरदारांच्या पलटणीनी केलेला पराक्रम अितका सुरेख चित्रबद्ध झालेला आहे की तो शब्दबद्ध करणं कठिण ! ऐतिहासिक वस्तूंमध्ये तंजावर शैलीतील मेणाचं चित्र, प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिरातील लोखंडी साखळ्या, पिसाच्या जगप्रसिद्ध मनोऱ्याची प्रतिकृती, फत्तेपूर सिक्रीतील शेख सलिम खिस्तीच्या कबरीची प्रतिकृती, हत्यारे अशा अनेक अल्लेखनीय वस्तू आहेत. याशिवाय चंदनाच्या लाकडावरील सुबक कोरीव काम, चीन, जपान, युरोपामधील अत्तम नक्षीकाम असलेली चिनी मातीची भांडी, संगमरवरी दगडावरील नक्षीदार जाळीच्या खिडक्या, इंग्लडचे जुने घड्याळ अशा अनेक सुरेख वस्तू संग्रहालयात आहेत. चित्ता, लहान मुलांना विशेष गंमत वाटेल अशा वस्तू म्हणजे ढाण्या वाघ, सुसर, मगर असे प्राणी. सांगलीच्या राजेसाहेबानी महाबळेश्वराच्या जंगलात मारलेला ढाण्या वाघ आणि तळसंगीच्या तलावात मारलेली सुसर आदी प्राणी म्हैसोरहून पेंढा भरुन आणली आहेत. प्रत्यक्ष प्राणीच समोर आहेत असं वाटून, किंचितकाल थरकाप अडवून देणारे हे प्राणी आहेत हे निश्चित. या संग्रहालयातील हजार बाराशे दुर्मिळ वस्तू पहायला सर्वसामान्य प्रेक्षकाला अर्धा तास पुरेल पण एखाद्या चोखंदळ रसिकाला दोन ताससुद्धा कमीच पडतील. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभागाकडे याची व्यवस्था आहे. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत लोकाना पाहाण्यासाठी ते अघडे असते. सोमवारी सुट्टी असते आणि इतकं चांगलं संग्रहालय बघायला प्रवेश सांगली आणि सांगलीकर.. .२६२