पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहेत. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यानी आणविलेल्या संगमरवरी दगडापैकी जो शिल्लक होता, तो आप्पासाहेबानी मिळवला होता. या मूर्ती अभ्या असाव्यात की बसलेल्या, त्यांच्या हातात आयुधे कोणती असावीत, यासंबंधीचे सर्व बारीकसारीक तपशील पुण्याचे वे. शा. सं. चिंतामण दीक्षित आपटे यांच्याकडून घेण्यात आले. आणि त्याबरहुकुम मूर्ती घडविण्याचे काम स्थानिक कारागीर, मुकुंदा आणि भिमाण्णा पाथरवट यानी विलक्षण सुबकतेने केले. प्रत्येक मूर्तीच्या सिंहासनाखाली सोने, रुपे व पंचरले घातलेली आहेत... बांधकाम पूर्ण झाल्यावर म्हणजे १८४४ मध्ये ( चैत्र शुद्ध १० शके १७६६ ) 'अर्चा' समारंभ एखाद्या लग्नकार्यासारखा मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. दूरदूरचे वैदिक आणि शास्त्रीपंडित बोलावून मोठा दानधर्म करून, राजेशाही इतमानाने आणि तितक्याच धार्मिकतेने पाचही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. चिंतामणराव आप्पासाहेबांजवळ असलेल्या ज्या मूर्तीचा वर अल्लेख आलेला आहे, तिचीही स्थापना करण्यात आली. अशा रीतीने त्यांच्या प्रतिज्ञेची पूर्तता झाली. मात्र बांधकामाची कामे मधूनमधून चालूच होती. संस्थान विलीन झाल्यानंतरसुद्धा दुसऱ्या चिंतामणराव आप्पासाहेबानी देवालयाच्या सभामंडपाचे आणि भव्य महाद्वाराचे काम पूर्ण केले. 'अर्चा' समारंभापासून म्हणजे १८४४ पासून संस्थानच्या गणपती अत्सवाला प्रारंभ झाला; संस्थान विलीन झाले असले, तरी आजसुद्धा हा अत्सव भक्तिभावाने होत असतो. सर्व पूजा-अर्चा नित्यनेमाने, पारंपारिक पद्धतीनुसार व्हाव्यात म्हणून, सांगलीकर राजेसाहेबानी 'श्री गणपती पंचायतन संस्थान' हा खाजगी ट्रस्ट निर्माण केला आहे. मंदिरात रोज सकाळी काकडआरती, सूर्योदय व सूर्यास्त यानंतर एक तासाने आरती, शेजारती आणि मंत्रपुष्प असते. सकाळी गायन असते. प्रत्येक महिन्यात विनायकी, संकष्टी, शिवरात्र शुद्ध सप्तमी, शुद्ध अष्टमी आणि शुद्ध चतुर्दशी असे सहा दिवस छबिने असतात. एकेकाळी मंदिराकडे १८ हत्ती होते. आता फक्त आबालवृद्धांचा लाडका 'बबलू' हत्ती, काही बैल, गायी, अंट, घोडे अशी जनावरं राहिली आहेत. राजस्थानी लाल-गुलाबी पाषाणाचे प्रवेशद्वार, अष्टखांबी विशाल सभामंडप, मध्यभागी असलेलं असंख्य लोलकांचं झुंबर, काळ्याशार गुळगुळीत आणि ताशी गाभाऱ्याच्या अग्रभागी, ऋद्धिसिद्धीसह विराजमान झालेली श्री गजाननाची सालंकृत मूर्ती, टवटवीत फुलांच्या हारांनी अधिकच खुलून दिसणारी, आजूबाजूच्या रम्य परिसरातील गणपती पंचायतन, मंदिरातील स्वच्छता, टापटीप, मंगलमय वातावरण यामुळं मंदिर कसं प्रसन्न असावं, मनोवेधक दिसावं याचा एक आदर्श वस्तूपाठच या गणपतीमंदिरानं घालून दिला आहे. सांगलीच्या सर्व जातीजमातीच्या लोकांचं हे एक सांगली आणि सांगलीकर... . २५९