पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणजे वस्तुसंग्रहालय आहे. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे याच वास्तूत असलेल्या तुरूंगातून, खंदकातील पाण्यात अड्या मारुन १९४३ मध्ये वसंतदादानी पलायन केले होते.. २. सांगलीचे आराध्यदैवत - श्री गणपती मंदिर : मिरज जहागिरीतून फुटून श्रीमंत आप्पासाहेबानी सांगली संस्थानची स्थापना केली हे आपण बघितलं. असं म्हणतात की वैतागून मिरजेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याजवळ फक्त सिंहासनारुढ ताम्र धातूची श्रीगणेशाची मूर्ती होती. त्यावेळी त्यानी मनोमन त्या मूर्तीची आराधना केली. “सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ द्यात. मी तुझी प्रतिष्ठापना एका मंदिरात करेन" सुदैवाने तसेच झाले. संरक्षणासाठी गणेशदुर्गाचं बांधकाम, धोंडजी वाघाची मोहीम अशा कामाच्या गर्दीतूनही श्रीमंताना आपल्यावर कृपाछत्र धरणाऱ्या या चिंतामणीचा विसर पडला नव्हता. निरनिराळ्या देवळांचे नकाशे अतरून आणण्याचे काम चालू होतंच. आज कुणाला सांगितलं तर नवल वाटेल. मूळच्या योजनेनुसार, गणपतीमंदिराचे काम स्वानंदभुवनाच्या म्हणजे आजच्या माळबंगल्याच्या माळावर सुरू झाले होते. पुढे या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवल्याने, कृष्णातीरी म्हणजे सध्याच्या जागी मंदिर बांधण्याचे ठरले. पण इथली अडचण अगदी अलट्या स्वरुपाची होती ! म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी आणि जिकडे तिकडे पाण्याचा गाळच गाळ. या जागेत खाली धर नसल्यानं, सारा खोलगट भाग वाळू आणि चुन्यानं भरून काढावा लागला. कृष्णा नदीच्या पुरापासून सुरक्षित रहावं म्हणून या मंदिराची अभारणी मोठ्या कल्पकतेने करण्यात आली आहे. सर्व मंदिराचा आकार, तीस ते चाळीस फूट खोल चुनेगच्चीने भरुन काढण्यात आला आहे. त्यामुळे गावात कृष्णेच्या पुराचे पाणी शिरले तरी त्याला मंदिरात प्रवेश नसतो ! हे थोडं विलक्षणच आहे. आता अशा नदीकाठच्या मंदिरासाठी दगड कसा कठीण हवा, म्हणून सर्वत्र शोध घेण्यात आला. तेव्हा ज्योतिबाच्या डोंगरावरुन काळा दणकट दगड आणण्यात आला. वाहतुकीची आजच्या सारखी सोय नव्हती. मोठ्या कष्टानं वडारी गाड्यांतून दगड आणावा लागला. प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात १८११ मध्ये झाली. तब्बल ३०-३२ वर्षे काम चालू होते. प्रमुख मंदिर म्हणजे श्री गजाननाचे. भोवतालच्या रम्य परिसरात, श्री चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरी देवी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे बांधण्यात आली. श्री गणपती पंचायतन म्हणजे शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण आणि गणपती असं पाच मूर्ती असलेले गणपती मंदिर अभावानंच आढळतं. पंचायतनाच्या पाचही देवांच्या मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाच्या सांगली आणि सांगलीकर.. .२५८