पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अधिक आवड निर्माण करण्याच्या अद्देशाने, मंडळाने, निरनिराळ्या वयोगटातील मुलामुलींसाठी विविध स्पर्धा सुरु केल्या आहेत. त्यामुळे सांगली आणि बुद्धिबळ असे समीकरणच देशात रुढ होऊ लागले. नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून मंडळाने, सांगलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दुमदुमत ठेवले. ही मंडळाची मोठीच कामगिरी म्हणायला हवी. या मंडळामुळे बुद्धिबळ क्षेत्रात, सांगलीला नामंकित खेळाडू देता आले. परदेशात बुद्धिबळ खेळण्यास जाणारा पहिला भारतीय खेळाडू हा एक सांगलीकरच होता. कै. विनायकराव खाडिलकर १९२४ साली अिंग्लडला गेले होते. नंतर कै. भालचंद्र म्हैसकर हे रशियाला जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिंपियाडसाठी, पहिल्या भारतीय संघाचे खेळाडू होते. सौ. भाग्यश्री साठे आणि स्वाती घाटे या मंडळाच्या महिला खेळाडूंविषयी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मंडळाचे अध्वर्यू, श्री भाऊराव पडसलगीकर १९८७ मध्ये रशियाला गेलेल्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. मंडळाने भरविलेल्या महिला स्पर्धामधूनच, सांगलीच्या भाग्यश्री साठे, आणि स्वाती घाटे यांखेरीज, शिला व विमल कानेटकर, जयश्री संकपाळ, शुभांगी मनोळकर, सुनंदा देसाई, पल्लवी शहा आदी महिला खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. विविध प्रकारच्या वयोगटापासून तो खुल्या स्पर्धा सातत्याने आयोजित करणारी संपूर्ण भारतातील ही एकमेव संस्था आहे ही वस्तुस्थितीच, मंडळाचे कार्यकर्तृत्व सांगण्यास पुरेशी बोलकी आहे. --- सांगली आणि सांगलीकर, . २५६